डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटील

Spread the news

डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटील

­

 

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकने सातत्याने विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबविल्यानेच महाराष्ट्रातील ” बेस्ट पॉलिटेक्निक” पुरस्कार मिळाला आहे.पॉलिटेक्निकचे हे यश कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन डी. वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी सांगितले. बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता संवादवेळी ते बोलत होते.

  •  

ऋतुराज पाटील म्हणाले की, स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी गुणवत्ता हाच एकमेव पर्याय आहे. काळाची पावले ओळखत पॉलिटेक्निकने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच पॉलिटेक्निकला हा सन्मान प्राप्त झाला आहे.

प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सांगितले की, पॉलिटेक्निकला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून यापूर्वी एक्सलंट श्रेणी प्राप्त झाली आहे. बेस्ट पॉलिटेक्निक म्हणून मिळालेला हा पुरस्कार ऊर्जा देणारा आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे पाठबळ आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम यांचे सहकार्य तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचा या यशात वाटा असल्याचे नमूद केले.
यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभाग प्रमुख डॉ. पी.के. शिंदे, प्रा. एस.बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे,विजय पाटील, सागर पाटील उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!