*दुष्काळग्रस्त वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या अटीविना परीक्षा शुल्क माफ*

Spread the news

*दुष्काळग्रस्त वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या अटीविना परीक्षा शुल्क माफ*

­

 

*दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैद्यकीयच्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा*

  •  

*​वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा महत्त्वपूर्ण निर्णय*

*राज्यातील ३०५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना होणार लाभ*

​मुंबई, दि. १९ : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्नाची ८ लाख रुपयांची मर्यादा लागू न करता सरसकट परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निर्णयाला मान्यता दिली असून, यामुळे आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात किंवा परीक्षेत कोणताही अडथळा येणार नाही.
​३०५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
सन २०२६ च्या खरीप हंगामात मदत व पुनर्वसन विभागाने सुरुवातीला २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ निकषांच्या आधारे राज्यातील एकूण ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्याच्या शासनाच्या धोरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
​या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैद्यकीय पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट न लावता परीक्षा शुल्क माफी मिळेल. यासोबतच आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (ईबीसी), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनाही या शुल्क माफीचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

□ ३७.९२ कोटींच्या शुल्काचा भार…..
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, २०२६ च्या हिवाळी सत्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे मिळून १ लाख ६ हजार ३०८ विद्यार्थी परीक्षेस पात्र आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी सुमारे ३७.९२ कोटी रुपये इतकी रक्कम अपेक्षित आहे. विद्यापीठाचा परीक्षा आयोजनाचा मोठा खर्च लक्षात घेऊन शासनाने या आर्थिक बाबींचा विचार करून हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण व दुष्काळग्रस्त भागातील भावी डॉक्टरांना मोठा आधार मिळणार आहे.
=======


Spread the news

You may also like

error: Content is protected !!