गडहिंग्लजचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याचे समाधान…..
मंत्री हसन मुश्रीफ यांची भावना…..
मुंबई, दि. १९:
गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याचे समाधान मोठे आहे, अशी भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
गडहिंग्लजमध्ये गेली वीस दिवस तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या तीव्र भावना मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून पोहोचवल्या होत्या.
मुंबईत महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जंजिरा या निवासस्थानी महायुती समन्वय समितीच्या बैठकीस मंत्री श्री मुश्रीफ उपस्थित होते.
आज मुंबईतील ‘जंजिरा’ शासकीय निवासस्थानी आयोजित महायुती समन्वय समितीच्या बैठकीस उपस्थित राहिलो. या बैठकीत राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना आणि जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि शेतीच्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर कामाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले. तसेच महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय, संवाद आणि सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने यावेळी चर्चा केली.
या बैठकीस राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे, उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांच्यासह समन्वयक श्री. सुधीर देऊळगावकर, श्री. आशिष कुलकर्णी आणि आ. श्री. संजय खोडके उपस्थित होते.
=====



