पाणीपट्टीचे दर पूर्ववत करून खाजगी सहकारी धरण संस्थांना दिलासा द्या
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे राजे समरजितसिंह घाटगे यांची मागणी
कागल, प्रतिनिधी : खाजगी सहकारी धरण संस्थांना आकारण्यात येणारी पाणीपट्टी पूर्वीप्रमाणे क्षेत्र व पिकांनुसार आकारावी, अशी मागणी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली.
मुंबई येथे मंत्री विखे-पाटील यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन घाटगे यांनी निवेदन सादर केले. यावेळी या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे घाटगे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी संस्थांच्या प्रतिनिधींनी घाटगे यांची भेट घेऊन हा प्रश्न शासनदरबारी मांडण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने घाटगे यांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली.
सुमारे ७५ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी सहकारातून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारले. याचेच अनुकरण करत त्याच धर्तीवर शासनानेही राज्यात बंधारे बांधले आहेत. मात्र, शासकीय व खाजगी सहकारी धरण संस्थांच्या पाणीपट्टीत मोठी तफावत असल्याने संस्थांसह शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे अवास्तव थकबाकी निरंक करावी आणि जलमापक मीटरची सक्ती करू नये, अशीही मागणीही घाटगे यांन यावेळी शेव साखर
चौकट : वीजबिल माफीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
कोरोना काळापासून थकीत असलेल्या ६० ते ७० कोटी रुपयांच्या वीजबिलांपैकी ५० टक्के रक्कम कृषी संजीवनी योजनेत भरण्याची परवानगी द्यावी. तसेच सहकारी पाणीपुरवठा संस्थांची सुमारे ६५० कोटींची वीजबिले माफ करावीत, अशी मागणी घाटगे यांनी केली. यासह वीजबिलाबाबतच्या संस्थांच्या विविध मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री विखे-पाटील व संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित झाले. अशीही माहिती घाटगे यांनी दिली.
फोटो ओळ : मुंबई येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करताना राजे समरजितसिंह घाटगे.



