आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या ६ लाख वह्यांचे वाटप…
वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्याची, मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवस…
कोल्हापूर *: आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या म्हणजे, गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, ही मदत आभाळा इतकी मोठी आहे. या वह्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक स्वप्न तयार करतात. वही स्वरुपी या मदतीतून, लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागत असून, संवेदनशील नेतृत्व म्हणून, आमदार सतेज पाटील यांचा हा उपक्रम अनुकरणीय आहे. असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यक डॉ. राजन गवस यांनी काढलेत. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त संकलित झालेल्या वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
Vo. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या ६ लाख वह्यांचे वाटप, आज शनिवारी ज्येष्ठ साहित्यक डॉ.राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आलं. शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना डॉ. राजन गवस यांनी, एखादा लोकप्रतिनिधी, एखादा प्रघात बदलून त्याला विधायक वळण देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा किती मोठे काम उभे राहू शकते याचा वस्तुपाठ आमदार सतेज पाटील यांच्या वही संकलनाच्या उपक्रमातून पाहायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या म्हणजे, गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, ही मदत आभाळा इतकी मोठी आहे. वही स्वरुपी या मदतीतून, लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागत असून संवेदनशील नेतृत्व म्हणून, आमदार सतेज पाटील यांचा हा उपक्रम अनुकरणीय आहे. असे गौरवोद्गारही ज्येष्ठ साहित्यक डॉ. राजन गवस यांनी काढलेत. सध्याच्या शैक्षणिक पद्धतीवरही डॉक्टर राजन गवस यांनी परखड मत व्यक्त केलं. एक चांगला माणूस घडवणाऱ्या शिक्षणाची सद्या गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुलांना समर्थ बनवा. मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना दूर ठेवा, एक दिवस मोबाईलचा उपवास करा. नकार पचवायची शक्ती मुलांच्या मध्ये तयार करा. असं आवाहनही त्यांनी केलं.
Byte : डॉ. राजन गवस.
Vo. 02 आमदार सतेज पाटील यांनी, राजकारण आणि समाजामध्ये काम करत असताना चांगल्या गोष्टी लोकांसमोर ठेवणे हे आपलं कर्तव्य समजून वाढदिवसाच्या निमित्तान वह्या संकलनाचा उपक्रम सुरू केल्याच त्यांनी सांगितल. आपला उद्देश प्रामाणिक असेल तर त्याला यश देखील मिळत असते. त्यानुसार, वाढदिवसानिमित्त दरवर्षी लाखो वह्या
संकलित होत आहेत.
इंटरनेट आणि मोबाईलचा योग्य वापर ही आता काळाची गरज असल्याचही त्यांनी सांगितलं. मोबाईल मुळे संवाद कमी होत चालला आहे.
मोबाईलचा योग्य वापर हा नव्या पिढीसमोर आवाहन असणार आहे. मोबाईलमुळ लाखों प्रलोभन तरुणाईसमोर आली आहेत. मोबाईलमुळ अभाशी जग निर्माण झालय. वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळामध्ये वाटप करण्याकरीता जाताना कार्यकर्त्यांनी मोबाईलचा वापराबाबत विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रबोधन करावं. आताच्या तरुण पिढीला योग्य वाटेवर ठेवणे, ही जबाबदारी पार पाडूया अस, आवाहनही त्यांनी केलं.
Byte : आमदार सतेज पाटील.
Vo. 03 आमदार जयंत आसगावकर यांनी, आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी लाखो वह्या संकलित होत असून अनेक दुर्गम गावात त्या वाटप केल्या जात आहेत. त्यामुळ, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा उपक्रम बळ देणारा असल्याचं त्यांनी सांगितलं.माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, 2007 पासून वह्या संकलनाचा सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आत्तापर्यंत 64 लाख 37 हजार 700 वह्या संकलित झाल्याचं त्यांनी सांगितल.
आतापर्यंत 14 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना या वह्या माेफत वाटप करण्यात आल्या. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डमध्ये आणि
वर्ड बुक मध्ये देखील झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अहमदाबाद विमान अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमा वेळी,
माजी महापौर वंदना बुचडे ,
माजी उप महापौर संजय मोहीते, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, सुलोचना नायकवाडे, माजी नगरसेवक प्रविण केसरकर, राजेश लाटकर,
राहूल माने, संदीप नेजदार, मधुकर रामाणे, माणिक मंडलीक , लाला भोसले, विनायक फाळके,
रवी आवळे, मोहन सालपे ,
तौफीक मुल्लणी, प्रकाश चौगले
विक्रम जरग, दुर्वास कदम , रियाज सुभेदार सुनिल मोदी यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.