*कसबा बावड्यातील सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लावू : आमदार राजेश क्षीरसागर*
*भागातील विकासकामे मार्गी लावल्याबद्दल बावडावासियांकडून सत्कार; दिलेल्या पाठबळाबद्दल आमदार राजेश क्षीरसागर बावडावासियांसमोर नतमस्तक*
कोल्हापूर दि.२२ : कसबा बावडा आणि शिवसेनेचे अतूट नाते असून, कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कसबा बावड्यातील जतना नेहमीच माझ्या बाजूने उभी राहिली असून त्याची मला जान आहे. त्यामुळेच कसबा बावड्याच्या विकासास नेहमीच प्राधान्य दिले आहे. राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलाकरिता निधी, राजाराम बंधारा ते कसबा बावडा रोड करिता निधी, तिरंगा लाईट लावणे, हनुमान तलावाचे सुशोभिकरण, यासह बावड्यातील प्रमुख मार्ग आणि अंतर्गत कॉलनी, गल्ल्यामधील रस्त्याची कामे, पाणद्यांचा विकास आदि कामांसाठी आजतागायत कोट्यावधी रुपयांच्यावर निधी वितरीत केला आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जाण कसबा बावडावासियांना असून, विधानसभा निवडणुकीत दबावशाहीला झिडकारून बावडावासियांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठबळ दिले. त्यामुळे कसबा बावड्याच्या विकासाकरिता सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत आमदार राजेश क्षीरसागर कसबा बावडावासियांसमोर नतमस्तक झाले.
कसबा बावडा येथी श्री कॉलनी परिसरातील विकास कामे मार्गी लावल्याबद्दल परिसरातील नागरिकांच्यावतीने आमदार राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, कसबा बावडा हा कोल्हापूर शहराचा अविभाज्य घटक आहे. कसबा बावडा हिंदुत्ववादी असून, येथील जनतेने शिवसेनेला नेहमीच पाठबळ दिले आहे. कसबा बावडा वासीयांच्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होत असल्याने माझे आणि कसबा बावडावासियांचे कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. या ठिकाणच्या नागरिकांना मुलभूत सोई सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्राधान्याने काम केले आहे. परंतु, काही वेळा कसबा बावडा वासीय आणि माझ्या नात्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाला. पण, सुज्ञ जनतेने विरोधकांची खेळी ओळखून मला या भागातून पाठबळ दिले. निवडणुका होतात जातात पण निर्माण झालेले कौटुंबिक नात टिकले पाहिजे हाच उद्देश ठेवून आगामी काळात कसबा बावड्यातील उर्वरित विकासकामांना निधी उपलब्ध करून दिला जाईल.
माझ्या आमदार निधीतून श्री कॉलनी नंबर २ व ३ मधील सिमेंट काँक्रीटचे रस्ते पूर्ण करण्यात आले, तसेच इतर रस्ते व गटारी यासाठी निधी मंजूर आहे. लवकरच ते देखील काम पूर्ण होईल. कसबा बावडा लाईन बाजार परिसरातील विविध विकास कामासाठी निधी देण्यात आला आहे. लाईन बझार परिसरातील बफर झोनच्या अटी शिथिल करून स्थानिक रहिवास्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. झूम प्रकल्पामुळे होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यासह शुगरमिल चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा, राजाराम बंधाऱ्याचा नवीन पर्यायी पुलाचे बांधकाम, हॉकी स्टेडियम सुधारणा, पाणंद रस्ते, श्री हनुमान मंदिर विकास यासाठी लवकरच निधी मंजूर करून हे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील. कसबा बावडा नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याबद्दलही आमदार राजेश क्षीरसागर यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव, तोरणागड कार्यालय प्रमुख कृष्णा लोंढे,आदर्श जाधव,उपशहर प्रमुख जय लाड,विभाग प्रमुख रणजित शिंदे,एकनाथ खोत,किशोर घाटगे, अण्णासाहेब पिंगळे, ॲड. संजय घाटगे, काका सुनगार, धीरज पाटील, दादा कांबळे, मोहन शिंदे, विश्वनाथ आंबी, अभी मोगणी यांच्यासह भागातील मान्यवर, नागरिक, शिवसैनिक उपस्थित होते.