गोकुळ ची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढणार

Spread the news

 गोकुळ ची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढणार

­

 

जि.प. अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

  •  

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येत्या जून महिन्यात होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पहिला अध्यक्ष भाजपचा की राष्ट्रवादीचा याचा फैसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा असेही या बैठकीत ठरले. मुंबईत ही बैठक झाली.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार, पदाधिकारी यांची जिल्हा परिषद व गोकुळ निवडणुकीबाबत बैठक झाली.  यामध्ये सविस्तर चर्चा झाली. गोकुळची निवडणूक महायुती म्ह्णून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती पूर्ण होताच उमेदवारी देण्याबाबत बैठक घेण्याचे ठरले.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक वीस सदस्य निवडून आले आहेत. यामुळे या पक्षाने अध्यक्षपदावर दावा केला आहे. पण, बारा सदस्य निवडून आलेल्या भाजपनेही हक्क सांगितला आहे. यामुळे या बैठकीत निर्णय झाला नाही. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, त्यासाठी त्यांच्या उपस्थितीत दोन्ही उपमुख्यमंत्री व जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेण्याचे ठरले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!