*शहरात आजपासून एक दिवस आड पाणीपुरवठा*
*सी व डी वॉर्डला दैनंदिन पाणीपुरवठा*
कोल्हापूर, दि. 28 :
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तीन पंपापैकी एक पंप नादुरुस्त झाल्याने शहरातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. सदर पंप कार्यान्वित होईपर्यंत पूईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड तसेच सलग्न उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
👉 ए व बी वॉर्ड
गुरुवार, दि. 28 ऑगस्ट 2025 पासून ए व बी वॉर्ड तसेच संलग्न उपनगर आणि ग्रामीण भागातील परिसरात एक दिवस आड पाणीपुरवठा होईल. या अंतर्गत पूईखडी परिसर, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, आपटेनगर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, नानापाटील नगर, तुळजामवानी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखेनगर, राजीव गांधीनगर, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, आयटीआय परिसर, जोगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, बालाजी पार्क, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, शेंडापार्क आदी सर्व परिसरांचा समावेश आहे.
👉 ई वॉर्ड
शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट 2025 पासून ई वॉर्डात एक दिवस आड पाणीपुरवठा होईल. यात राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूपूरी, राजेंद्रनगर, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत आदी परिसरांचा समावेश आहे.
🟢 सी व डी वॉर्डला मात्र नियमित पाणीपुरवठा सुरू राहील.
तरी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक सौ. के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
💧 टँकर व्यवस्था
ज्या भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होणार नाही, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
➡️ कळंबा फिल्टर हाऊस संपर्क : श्री. गणेश लोंखडे (मो. 9766360506)
➡️ बावडा फिल्टर हाऊस संपर्क : श्री. संभाजी पाटील (मो. 9860448844)
0000000