खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत १८०० मुलांचा सहभाग
चेअरमन साताप्पा कासार यांची माहिती
खाजगी प्राथ शिक्षक सेवक सह पतसंस्था कोल्हापूरच्या वतीने इ ४ थी व ७ वी साठीची शिष्यवृती सराव परीक्षा न्यू एज्युकेशन सोसायटीच्या न्यू हायस्कूल व प्रि .पद्माराजे हाय . कोल्हापूर येथे घेणेत आली मा. प्राचार्य प्रभाकर हेरवाडे सरांचे हस्ते या परीक्षेचा शुभारंभ झाला पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे अध्यक्षस्थानी होते आभार संचालक मच्छिंद्र नाळे यांनी मानले. उद्घाटन वेळी बोलताना मा. प्राचार्य प्रभाकर हेरवाडे म्हणाले की पतसंस्था राबवत असलेला हा उपक्रम स्तुत्य आहे अशा उपक्रमासाठी आमची सोसायटी नेहमीच सहकार्य करते. अध्यक्ष पदावरून बोलताना भरत रसाळे म्हणाले की मुलांना शासकीय स्कॉलरशिप परीक्षे अगोदर सराव मिळावा व त्यांची चांगली तयारी व्हावी या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम राबवला आहे. चेअरमन साताप्पा कासार म्हणाले की पतसंस्था दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते या सराव परीक्षेमुळे मुलांचाही आत्मविश्वास वाढतो.
कोल्हापूर बरोबरच गारगोटी, गडहिंग्लज, कागल व कबनूर येथे ही परीक्षा एकाच वेळी घेण्यात आली . सुमारे 1800 विद्यार्थ्यानी या परीक्षेत सहभाग घेतला हजारो पालकांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपला सहभाग नोंदवला .केंद्र संचालक गोरख वातकर, सहसंचालक म्हणून अमित परीट यांनी चोख काम पार पाडले . सागर पाटील यांनी मोठी धुरा सांभाळली .ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी खाजगी प्राथ.शाळांतील 150 शिक्षक बंधूभगिनीनी पर्यवेक्षण व पेपर तपासणीचे काम अगदी आनंदाने केले . पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा कासार , व्हा . चेअरमन अमित परीट . सचिव वसंत पाटील यांच्यासह सर्व संचालक व सल्लगार मंडळ व व्यवस्थापक सदाशिव साळवी , सुबोध कोल्हटकर यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग यांनी सायं 7 पर्यत परीक्षास्थळी थांबून पेपर तपासणी स्वतः व इतरांसह करवून घेतली . या सर्वांच्या मेहनतीने आजची ही शिष्यवृती सराव परीक्षा उत्साहात पार पडली.




