*काँग्रेसकडून ३२९ जणांनी दिल्या मुलाखती, दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी मागितली उमेदवारी*

Spread the news

*काँग्रेसकडून ३२९ जणांनी दिल्या मुलाखती, दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी मागितली उमेदवारी*

­

 

*कोल्हापूर :* महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ३२९ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस कमिटीत दुसऱ्या दिवशी झालेल्या या मुलाखतीत प्रभाग क्रमांक ११ ते २० मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांत काँग्रेसकडे ३२९ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. मंगळवारी १३५ जणांनी मुलाखत दिली होती. गत महापालिकेत काँग्रेसने सत्ता काबीज केली होती. त्यामुळे काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे. प्रभाग मोठे झाल्याने अनेक इच्छुकांना आपल्या स्वप्नांवर पाणी फेरावे लागत असले तरी तुम्ही जो निर्णय द्याल तो आमच्यासाठी अंतिम असेल असे सांगत सर्वच प्रभागांमधील इच्छुक कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना आश्वस्त केले. माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन चव्हाण, आनंद माने, राजू लाटकर,भारती पोवार, सरलाताई पाटील, भरत रसाळे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या.

  •  

*चौकट :* काँग्रेसकडून प्रभाग ११ ते २० मधील या प्रमुखांनी दिल्या मुलाखती
यशोदा रविंद्र आवळे, जयश्री सचिन चव्हाण, सचिन चव्हाण, रियाज सुभेदार, उदय पोवार, ईश्वर परमार, वृषाली दुर्वास कदम, पद्मजा भुर्के, माणिक मंडलीक, प्रवीण सोनवणे, भूपाल शेटे, शमा मुल्ला, विनायक फाळके, अमर समर्थ, विजय सुर्यवंशी, शिवाजी कवाळे, आश्विनी अनिल कदम, संजय मोहिते, सुरेश ढोणुक्षे, पद्मावती काकासाहेब पाटील, उत्तम शेटके, शोभा कवाळे, प्रवीण केसरकर, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, वनिता देठे, प्रतिक्षा पाटील.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!