ॲड .उज्वल निकम यांच्या राज्यसभा सदस्यपदी निवडीनंतर आजोळी कोल्हापुरात आनंदोत्सव

Spread the news

ॲड .उज्वल निकम यांच्या राज्यसभा सदस्यपदी निवडीनंतर आजोळी कोल्हापुरात आनंदोत्सव

 

 

  •  

 

कोल्हापूर दिनांक 13. जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर माणसाला स्वतःचे जग निर्माण करता येत. परिस्थितीचे नेमके भान ठेवून पाऊले टाकीत ज्यांना काळाबरोबर धावता येत त्यांचा जीवनाचा प्रवास यशस्वी होत असतो. कायद्याच्या ज्ञानातून असाच आपल्या जीवनाचा प्रवास यशस्वी करणारे सुप्रसिद्ध कायदे तज्ञ विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड.उज्वल निकम साहेब.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मंगरूळ
हे त्यांचे जन्मगाव.वडील बॅरिस्टर देवराज माधवराव निकम हे 1962 ते 1967 या काळात आमदार होते. न्यायाधीश व बॅरिस्टरपदी चांगले कार्य त्यांनी केले होते.
आई विमलादेवी या कोल्हापूर मधील शिक्षण महर्षी, संस्कृत पंडित व प्राचार्य एम. आर .देसाई साहेब यांच्या भगिनी ,आई बरोबर ते नेहमी आजोळी कोल्हापूरला येत असत.माजी महापौर सुभाष राणे यांच्या पत्नी मीनाताई या उज्ज्वल निकमसाहेब यांच्या सख्या भगिनी. कोल्हापुरातील बालपणीच्या आठवणी ते नेहमी सांगतात.
न्यू शाहूपुरी मधील माजी आमदार कै. दिलीपराव देसाई, शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई यांचे ते आते भाऊ असल्यामुळे लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांच्यातील स्नेह त्यांनी जपला आहे.
ॲड.उज्वल निकम साहेब यांच्या राज्यसभा सदस्य निवडीनंतर न्यू शाहूपुरीतील घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी प्रा. जयकुमार देसाई ,श्रीमती.शिवानी देसाई (वहिनी )प्रा. डॉ.मंजिरी मोरे, युवा नेते दौलत देसाई, पृथ्वी मोरे तसेच सर्व देसाई परिवार व नातेवाईक उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!