‘केआयटी’ च्या ‘सानिया सापळे’चा जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभाग
अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंना केआयटीने दिले प्रोत्साहन
केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाची विद्यार्थीनी सानिया सापळेने जर्मनी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन आयोजित आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. ही विद्यार्थिनी काही वर्षे कनिष्ठ वर्गात ५० मीटर रायफल प्रोन या गटात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आलेली आहे. गेल्या वर्षी भोपाळ येथील ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सांघिक क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण व दोन कास्य पदके तिने संपादित केलेली आहेत.
ज्या पद्धतीने केआयटी शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवत आहे त्याच प्रकारे देशासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू ही या संस्थेतून शिक्षण घेत आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे केआयटीचे धोरण आहे. या धोरणामुळेच सानिया सारखे काही विद्यार्थी आज नेमबाजी स्पर्धा,रा टेबल टेनिस स्पर्धा, पॅराऑलिम्पिक अशा व अन्य खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत असे उद्गार केआयटीचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी यांनी काढले
संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली उपाध्यक्ष श्री सचिन मेनन, सचिव श्री दीपक चौगुले यांनी या आतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाबद्दल सानिया सापळे हीचे अभिनंदन केले आहे. संस्थेचे शारीरिक शिक्षण संचालक श्री.विजय रोकडे व सिव्हील आणि पर्यावरण अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.सौरभ जोशी यांचे तिला मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
फोटो तपशिल:- केआयटीची विद्यार्थिनी व आंतरराष्ट्रीय नेमबाज सानिया सापळे चे अभिनंदन करताना केआयटी चे सचिव श्री दीपक चौगुले, डावीकडून वडील सुदेश सापळे, केआयटी चे विश्वस्त सुनील कुलकर्णी, संचालक डॉ मोहन वनरोट्टी.