राज्या मध्ये बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व ३५ जिल्हा मध्ये कंत्राटदार यांचे भव्य , तीव्र ,उग्र धरणे आंदोलन होणार*
*महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग,जलजीवन मिशन अ़तर्गत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे केलेली कामे व इतर अनेक विभागाकडील* अंदाजे ८९ हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत व वर दिलेल्या विविध विभागांचे मागण्या यासाठी धरणे आंदोलन, मोर्चा, लाक्षणिक उपोषण, लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना सातत्याने गेल्या १० महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत.तसेच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या विषयावर संघटनेच्या शिष्टमंडळ बरोबर बैठक घ्यावी असे तीन चार वेळा विनंती पत्रेही दिले आहे. पण याबाबत फक्त संबंधितांचे सचिव स़बधित इतर मंत्री यांच्या कडून फक्त कोरडे बैठकीचे आश्वासन दिले जात आहे. यापुढे हा विषय जातच नाही.हि राज्यासाठी अत्यंत खेदजनक बाब आहे.
*या शासनाच्या कुचकामी धोरणामुळे आमचे कंत्राटदार अभियंता बंधु* यांनी आपले जीवन संपविले हा धक्का राज्यातील कंत्राटदार यांना जबरदस्त बसला यामुळे निराशा पोटी राज्यातील अनेक कंत्राटदार यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या जीवनाचे बरेवाईट करण्याची घोषणा केली होती , परंतु राज्य संघटनेने तो आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे ,यासाठी आपल्या अनेक बांधवांनी आपला देह त्यागला आहे, तेव्हा कुठे हा सुवर्ण दिन आपल्या जीवनात पहावयास मिळत आहे याची जाणीव करून दिली ,अशा शुभदिनी हे कृत्य करू नये, यासाठी कंत्राटदार यांचे मतपरीवर्तन केले ,यामुळे पुढील सर्व अनर्थ टळला . तसेच राज्यातील कंत्राटदार यांच्या नावावर भारताच्या स्वातंत्र्य दिनी जीवाचे बरेवाईट करून घेणारा कंलक दुर करण्यात संघटना यशस्वी झाली आहे. राज्याचा विकासाचा गाडा हा दोन चाकावर आहे एक चाक शासन ,प्रशासन आहे दुसरे चाक विकासाची कामे करणारे कंत्राटदार आहेत याची जाणीव सुद्धा शासन विसरले आहे सदर कंत्राटदार यांना कुटुंब व इतर चरितार्थ आहे ,इतर अनेक कोटी संख्येने असलेला वर्ग कंत्राटदारांवर अवलंबून आहे याची थोडीशी जाणीव राज्यकर्ते यांच्या रोजच्या दैनंदिन मधुन दुर्दैवाने दिसत नाही.
*यासाठीच कालच तिन्ही राज्य संघटनेची बैठक जबरदस्त संख्येच्या उपस्थितीत online पद्धतीने* पार पडली.या बैठकीत शासन कंत्राटदार यांचे प्रलंबित देयके न देणे व इतर अनेक विषयांवर निर्णय न घेतल्याचे निषेधार्थ शासनाच्या विरोधात संबंध महाराष्ट्राच्या ३५ जिल्हा मध्ये मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे व उग्र आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना चे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ चे महासचिव सुनील नागराळे व राज्य अभियंता महासचिव चे राजेश देशमुख व पाणीपुरवठा स़घटनाचे सदस्य किशोर जामदार,शरद पाटील यांनी दिली आहे.