*कोल्हापूरच्या कला- नगरीत धान्य व्यापाऱ्यांचा अनोखा प्रयत्न…….*
*पर्यावरणपुरक वरदविनायकाच्या नावानं साकार होणार स्वप्न….!!!!*
खासदार श्री छत्रपती शाहु महाराज
अध्यक्षतेखाली पुढारी माध्यम समुहाचे संपादक व चेअरमन मा श्री योगेश जाधव यांच्या शुभहस्ते* *संपन्न होणार भव्य आगमन सोहळा….!!!**
▶️ *महाराष्ट्रातील पहिलींच गणेशमूर्ती*
कोल्हापूर : –
सर्वांचे श्रद्धास्थान निर्गुणाचे सगुणरूप १०० % पर्यावरण पूरक, निसर्गनिर्मित वस्तु ,नैसर्गिक रंग यांच्या माध्यमातून बनवलेली श्री गणेशाची मूर्ती असावी, तिची वैदिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा आणि दैनंदिन पूजा अर्चा व्हावी, जल प्रदूषण होणार नाही, विसर्जनाच्या वेळी होणारे प्रदुषण टाळण्याच्या
उद्देश्याने धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाने पर्यावरण पूरक आणि कायमस्वरूपी श्रीच्या मूर्ती ” चा प्रकल्प हाती घेतला.गेल्याअनेक वर्षापासून व्यापारी वर्ग गणेशभक्त यांच्या असणाऱ्या इच्छा, संकल्पना स्वप्न यावर्षी पूर्णत्वास येत आहे….. दिनांक २ ऑक्टोंबर २०२४ घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावरती मातीपूजन करून श्रीच्या मूर्तीच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून झाडांची गळलेली पानं फुले त्याचबरोबर वेली आणि साली मुंगलीनेची चेचून
घेऊन त्यांचे मिश्रण करण्यात आले आहे मिश्रणाची पेस्ट तयार करण्यासाठी त्यामध्ये बाभळीच्या डिंकाचा वापर केलेला आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास ७ ते ८ महिन्याचा कालावधी लागला.मूर्तीच्या टिकाऊपणासाठी कागद, कागदी पट्टा, लाकूड यांचा वापर केलेला आहे.मूर्ती सुबक आणि देखणी दिसण्यासाठी मूर्तीच्या वरती पानं, पुल, वेल झाडांची साल्याची पेस्ट करून त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्याचा वापर करून मूर्ती फिनिशिंग करण्यात आली आहे.रंग कामासाठी डाळींब , पारंपारिक बळूच्या रंगाचा वापर करण्यात आलेला आहे. नैसर्गिक साहित्याचा वापर केल्यामुळे १०० वर्षापेक्षा अधिक काळ टिकू शकणारी पर्यावरण गणेशमूर्ती कोल्हापूर मधील सुप्रसिद्ध मुर्तीकर श्री संदीप कातवरे यांनी बनवलेली आहे. मूर्तीच्या प्रतिष्ठानच्या जागेची वास्तुशांती वास्तुपुरुष अशा अनेक प्रकारच्या शास्त्रोक्त धार्मिक विधी प्रसिद्ध पुरोहित श्री गुरु स्वामी यांच्या शुभहस्ते शुभमुहूर्तावर केलेल्या असून मूर्तीच्या पोटामध्ये श्रीयंत्र गणेशयंत्र अशा अनेक यंत्रांचा समावेश आहे *स्थैर्य आणि पराक्रमाचे प्रतिक*
हत्तीचे मुख सिंहाचा पंजा अशा प्रकारच्या दशमुखी सव्वा फुट उंच सागवान लाकडाच्या पाटाची रचना केलेली असून याच पाटावरती या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे हि संकल्पना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आम्हास मार्गदर्शन देणारे दळवी आर्टचे प्राचार्य अजय दळवी यांचे मोलाचे योगदान मिळाले. शुक्रवार दि १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ५:०० मिरजकर तिकटी येथून खासदार श्री छत्रपती शाहु महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पुढारी माध्यम समुहाचे संपादक व चेअरमन मा श्री योगेश जाधव यांच्या शुभहस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीने भव्य आगमन सोहळा संपन्न होणार आहे . मिरवणूक सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी विश्व वारकरी जिल्हाध्यक्ष ओंकार महाराज सूर्यवंशी यांच्यासह ८ ते १५ वयोगटातील बालकलाकरांची वारकरी दिंडी ३१,३२ पावलाचं प्रकार, जुगलबंदी पावली,२४ मुलांचा मानवी रथ, मानवी गरुड, संगितमय खो- खो, यासारख्या पारंपारिक वाद्यांचा समावेश केला आहे. आगमन मिरवणूक सोहळ्यात १०० हुन अधिक व्यापारी एकसारखे ड्रेस परिधान करणार आहेत रात्री मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीपुरी मधील धान्य व्यापारी बालकल्याण संस्थेच्या इमारतीमधील सुसज्ज वरदविनायक मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. उत्सव काळामध्ये लक्ष्मीपुरी धान्यलाईन येथे भव्य मंडपामध्ये श्रींची मूर्ती गणेशभक्तांच्या दर्शनासाठी खुली केली जाणार आहे. नैसर्गिक सुबक, देखणी, वजनांने हलक्या श्रींच्या मुतीच्या दर्शनांचा लाभ लक्ष्मीपुरी मधील धान्य व्यापारी बालकल्याण संस्थंच्या इमारतीमधील सुसज्ज वरदविनायक मंदिरात १६ ऑगस्ट २०२५ पासून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गणेशभक्तांना घ्यावा असे आव्हान मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळ गेली ४५ वर्षे सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये अविरतपणे काम करत आहे. कोल्हापुर मध्ये दहीहंडी, असो अगर महाप्रसाद याची कोल्हापुरमध्ये सुरुवात झाली आपल्या मंडळापासुनंच त्यामुळे जुन्या चाली- रिती,रुढी- परंपरा जोपासणारे मंडळ म्हणून धान्य व्यापारी मंडळाची ओळख आहे.आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेहमीच अग्रेसर राहुन मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत.लातूर जिल्ह्यातील किंलारी येथील भुकंपाच्या वेळी केलेली मदत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. त्याबरोबर कोल्हापूरमधील सन २०१९ व २०२१ साली झालेल्या महापुर पूर असेल अशा अनेक वेळा प्रशासनाच्या बरोबर राहुन मदतीचा हात पुढे करणारे मंडळ म्हणून धान्य व्यापारी मंडळाची ओळख आहे.