संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या १३ वा वर्धापन दिनानिमित्त “निंबस २ के २५” विविध नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन

Spread the news

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या १३ वा वर्धापन दिनानिमित्त “निंबस २ के २५” विविध नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे १३ वा वर्धापन दिनानिमितत्ताने “निंबस २ के २५” या राष्ट्रीय स्तरावरील भव्य स्पर्धेद्वारे २३ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमात नवोन्मेष, प्रेरणा आणि उत्सव यांचा सुंदर संगम पहायला मिळणार आहे. नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कॅड बस्टर, पोस्टर प्रेसेंटेशन, सर्किट्रिक्स हँक हंट, मेलोडी मस्ती, तसेच कौन बनेगा सवालों का सरताज अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. विजेत्यांसाठी रु. १,००,००० पर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यावेळी रक्तदान शिबिर व पुस्तक दान उपक्रम या सामाजिक जबाबदारीशी निगडित कार्यक्रमांचाही समावेश केलेला असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्याचा इन्स्टिट्यूटचा मुख्य हेतू आहे.

हा कार्यक्रम संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रत करिअर करत असलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवा असे आव्हान करण्यात आले आहे. सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असून, इन्स्टिट्यूटच्या संकेतस्थळावर तसेच खालील लिंकवरून नोंदणी करता येणार आहे : https://forms.gle/mpcvXZg8vAcU1HX48

संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेला, प्रतिभेला वाव देणार असल्याने हा वर्धापन दिन संस्मरणीय ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक प्रा. एम. एस. काळे, प्रा. सौ. एन. एस. सासणे व टीम परिश्रम घेत आहेत, या कार्यक्रमाला संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!