*पाच जिल्ह्यांतील*
*शिक्षणांधिकारी यांचेकडून जुन्या पेन्शनकरीता शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पडताळणी सह मागून घ्यावेत* .
*महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी*
कोल्हापूर :
*कोल्हापूर विभागातील सांगली सातारा ,कोल्हापूर ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील मा . शिक्षणाधिकारी यांच्याकडून खाजगी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील 1 नोव्हे 2005 पूर्वीच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शन योजने करीताचे प्रस्ताव पडताळणीसह आपल्याकडे मागून घ्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालक मा .महेश चोथेसाहेब यांच्याकडे केली . याबाबतचे निवेदन समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे व शहराध्यक्ष आप्पा साहेब वागरे यांनी उपसंचालक कार्यातील शिक्षण निरीक्षक मा* . *समरजितसिंह पाटील यांना दिले . या निवेदनांत म्हंटले आहे की , मुंबई उच्च* *न्यायालयाची याचिका क्र . 2345 /2014 दि 27 फेब्रुवारी 2025 च्या निकालान्वये आपल्या विभागातील पाच जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचीआहे अशांचे जुन्या पेन्शनबाबतचे प्रस्ताव पडताळणीसह मागवून घेण्याची कार्यवाही ठेवावी .अशी मागणी केलेली आहे* .
*याबाबतचा प्रस्ताव तातडीने कार्यवाही साठी मा .शिक्षण उपसंचालक महेश चोथेसाहेब यांच्यासमोर ठेवू असे आश्वासन शिक्षण निरीक्षक पाटील यांनी दिले* .