‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम* – तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा संपन्न

Spread the news

*‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत*
*कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*

– तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा संपन्न

कोल्हापूर : ‘
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या टप्पा क्र. २ मध्ये कसबा बावडा येथील कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाने यश मिळवले आहे. खाजगी व्यवस्थापन शाळा गट, केंद्र स्तर या गटात या शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

  •  

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत करवीर पंचायत समिती व प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगर पालिका ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या टप्पा क्र. २चा तालुका स्तरीय गुणगौरव सोहळा जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाला.

या अभियानात डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाने खाजगी व्यवस्थापन शाळा गट, केंद्र स्तर गटात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. करवीर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सौ. अर्चना पाथरे आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी श्री.डी.सी. कुंभार यांच्या हस्ते मुख्याध्यापिका गौतमी पाटील व सहकारी शिक्षकांनी हा पुरस्कार स्वीकारला.

विद्यालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले.

कोल्हापूर : सौ. अर्चना पाथरे आणि डी.सी. कुंभार यांच्याहस्ते तालुकास्तर पुरस्कार स्वीकारताना मुख्याध्यापिका गौतमी पाटील व सहकारी.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!