Spread the news

*वारणा विद्यापीठ अंतर्गत लॉ कॉलेजला मान्यता*

**वारणानगर** – वारणा विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्वाचा टप्पा गाठत आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू होणाऱ्या *वारणा स्कूल ऑफ लॉ* महाविद्यालयाला *बार कौन्सिल ऑफ इंडिया* आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे.

महाविद्यालयात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या *सीईटी पोर्टल*वर ऑप्शन फॉर्म भरताना *वारणा स्कूल ऑफ लॉ* (इन्स्टिट्यूट कोड ३५००१) निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  •  

येथे *तीन वर्षांचा LL.B.* (पदवीधरांसाठी) तसेच *पाच वर्षांचे B.A., LL.B.* आणि *B.B.A., LL.B.* (१२ वी नंतर एकात्मिक अभ्यासक्रम) असे दोन्ही प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध राहणार असून, प्रवेश महाराष्ट्र *CET* द्वारेच होणार आहे.

कायदा शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी न्यायालयीन सेवा, कायदेशीर सल्ला देण्याचे क्षेत्र, सरकारी नोकऱ्या, कॉर्पोरेट क्षेत्रातील कायदेशीर जबाबदाऱ्या तसेच उच्च शिक्षण व संशोधन यामध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.

विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी महाविद्यालयात *अनुभवी प्राध्यापकवर्ग*, *सुसज्ज मूट कोर्ट हॉल*, *समृद्ध ग्रंथालय*, *आधुनिक पायाभूत सुविधा*, तसेच *इंटर्नशिप आणि प्लेसमेंटचे मार्गदर्शन* यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या यशस्वी उपक्रमामागे वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष *डॉ. विनयरावजी कोरे* यांचे मार्गदर्शन व पाठबळ, आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळातील विविध पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – *9922410351*


Spread the news

You may also like

error: Content is protected !!