माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांचा गुरुवारी द्वितीय स्मृतिदिन
पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर
माजी महापौर आणि काँग्रेसचे तब्बल 22 वर्षे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या प्रल्हाद भाऊसो चव्हाण यांचा दुसरा स्मृतिदिन गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या निमित्ताने निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रल्हाद चव्हाण यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भरीव काम केले. तब्बल 35 वर्षे नगरसेवक आणि 22 वर्षे काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार प पाडली. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रल्हाद चव्हाण हे काँग्रेसचे एकनिष्ठ होते. त्यामुळे त्यांच्या नावाने मोहम्मद शरीफ शेख आणि सरस्वती कांबळे या दोघांना निष्ठावान कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय शहाजी चव्हाण, पांडुरंग करपे व शंकर माळी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार
गुरुबाळ माळी यांनी लिहिलेल्या निष्ठावंत या प्रल्हाद चव्हाण यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. खासबाग येथील गायन समाज देवल क्लब हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतेज पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, दडू पुरोहित, माजी आमदार राजीव बाबा आवळे, राजीव आवळे, सुरेश साळोखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष सुनील मोदी, सुजित चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, प्रफुल जोशी, चंद्रकांत यादव, रमेश उर्फ नाना उलपे, मदन चोडणकर कर यांच्याशिवाय महापालिकेचे अनेक आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी महापौर सागर चव्हाण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण तसेच कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशन व प्रल्हाद चव्हाण युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.