‘साहस’ चे दिव्यांग पुनर्वसनासाठी महत्वाचे पाउल…
2 सप्टेंबरला भूमिपूजन
- दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन
कोल्हापूर
ग्रामीण भागातील, तळागाळातील दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण पुनर्वसना साठी समविचारी कार्यकर्त्यानी ०३ डिसेंबर २०२० रोजी साहस डिसएबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशन, कोल्हापूर ची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने कागल तालुक्यातील करनूर येथे महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे त्याचा भूमिपूजन समारंभ दोन सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा नसीमा नसीमा हुरजूक, उद्योजक तेज घाटगे व अभिषेक मोहिते यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यासंदर्भात यांनी सांगितले की, हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड, कोल्हापूर मधील ३६ वर्षाचा अनुभव असल्याने साहस ला अल्पावधीत प्रचंड यश मिळाले. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे मोरे या गावी साहस संस्थेचा प्रकल्प सुरू आहे.
या संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या पहिल्या पुनर्वसन केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मंगळवार दि. ०२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता मु. पो. करनूर, ता. कागल जिल्हा. कोल्हापूर येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमास खासदार श्री. शाहू महाराज छत्रपती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार श्री. धैर्यशील माने हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्याला परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
या पुनर्वसन केंद्राच्या बांधकामासाठी एकुण येणारा अंदाजे खर्च रु. ७.५० (रुपये सात कोटी पन्नास लाख) आहे. एक चौरस फुट बांधकामचा खर्च रु. २,०००/- आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी याला हातभार लावणे आवश्यक आहे. प्रत्येकानी आपला खारीचा वाटा उचलावा. विशेषता गणेश मंडळाना आवाहन करण्यात येत आहे. साहसला आर्थिक मदत देऊन दिव्यांग व्यक्तीचे आयुष्य सुसह्य करावे.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नसीमा हुरजूक, उपाध्यक्ष श्री अभिषेक मोहिते, सचिव श्री तेज घाटगे, विश्वस्त श्री साताराम पाटील, विश्वस्त श्री अश्कीन आजरेकर, विश्वस्त सौ. मधुताई पाटील यांनी सर्वाना उपस्थित राहण्याचे आवाहान केले आहे
…….
साहस ने गेल्या साडेचार वर्षात केलेली कामगिरी
1. आज अखेर १२०० हुन अधिक दिव्यांग व्यक्तीची नोंदणी.
2. घरपोच व्हीलचेअर, उपचार, व्हिडिओ द्वारे शारीरिक स्वावलंबन व बेड सोअर उपचार. आज अखेर १८८ चांगल्या प्रतीच्या दिव्यांग व्यक्तीच्या कार्यक्षमतेत भर टाकणाऱ्या व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले.
3. साहस ने शस्त्रक्रिया करवुन व उत्तम प्रतीची कृत्रिम साधने देवून दिव्यांग व्यक्तीना उत्पादित घटक बनवले.
4. हेल्पर्स च्या विनंती नुसार स्वप्ननगरी प्रकल्प पांच वर्षा साठी हाती घेऊन ७७ दिव्यांगाना रोजगार मिळवुन दिला. या प्रकल्पाचा लाभ एकुण ९२ व्यक्ति घेत आहेत. याचे श्रेय बजाज फाईन सर्व ली. पुणे यांना आहे. त्यांनी ३ वर्षासाठी २.२६ कोटी मंजूर करून आमचा उत्साह वाढवला.
5. साहसने मार्च २०२५ अखेर दिव्यांग पुनर्वसना साठी केलेला खर्च रु. ३.७३ कोटी.