केआयटी च्या प्रथम वर्षाची सुरुवात ‘विशेष इंडक्शन’ ने संपन्न
विविध मान्यवर व्यक्तींकडून विद्यार्थ्यांचे प्रबोधन
येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात ‘विशेष इंडक्शन’ ने संपन्न झाली.५ दिवसीय विशेष मार्गदर्शन सत्राचे (इंडक्शन सेशन ) उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे संचालक डॉ मोहन वनरोटी यांनी केआयटी ची संस्कृती, कामाची पद्धत, पारदर्शकता,शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा केलेला वापर तसेच केआयटी च्या माजी विद्यार्थ्यांच्या विविध ‘माईल स्टोन’ ची नवीन विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधा लायब्ररी, जिमखाना, विद्यार्थ्यांसाठी असलेले विविध मंच याबद्दल थोडक्या शब्दात माहिती दिली. केआयटी चा परिसर हा इको फ्रेंडली असून तो अभ्यासासाठी अत्यंत पूरक आहे त्यामुळे या परिसराची काळजी घेणे ही सुद्धा आपली जबाबदारी असल्याबाबत त्यांनी मुलांना आवाहन केले.बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात स्वतःच्या स्वप्नांना आकार देणारा,समाज व देश हिताला प्राधान्य देणारा अभियंता होण्यासाठी विद्यार्थ्यांनी केआयटी ची निवड केली याबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. भविष्यात आपल्या स्वप्नपूर्ती मध्ये केआयटी भक्कमपणे सहकार्य करेल असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख डॉ.आसिफ कुरेशी यांनी विभागातील रचने बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी रजिस्ट्रार डॉ.डी.जे. साठे, संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता,डॉ. अक्षय थोरवत, विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ.जितेंद्र भाट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. शुभदा सावरखांडे यांनी केले सन्मानित सदस्यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या सह दीप प्रज्वलन केले. या कार्यक्रमाचे स्वागत पर भाषण या मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अभिजीत उळागड्डे यांनी केले. या विशेष सत्राच्या आयोजनात संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली, उपाध्यक्ष श्री सचिन मेनन, सचिव श्री दीपक चौगुले,अन्य विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभियांत्रिकीच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो तपशील
फोटो-१ व २ केआयटी च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ‘इंडक्शन सेशन’ मध्ये मार्गदर्शन करताना संस्थेचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी समोर उपस्थित प्रवेशित प्रथम वर्षाचे विद्यार्थी.