मानवी मूल्ये आणि नैतिकतेच्या माध्यमातूनच समाजाची प्रगती शक्य* लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांचे प्रतिपादन कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना, ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कार… डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा २० स्थापना दिवस उत्साहात

Spread the news

*मानवी मूल्ये आणि नैतिकतेच्या माध्यमातूनच समाजाची प्रगती शक्य*
लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांचे प्रतिपादन

कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना, ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कार…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा २० स्थापना दिवस उत्साहात

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सोमवारी २० वा स्थापना दिवस

  •  

कोल्हापूर

मानवी मूल्य आणि नैतिकता या माध्यमातूनच राष्ट्राची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन अतिविशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांनी केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरीही देणारे डी. वाय. पाटील विद्यापीठ येत्या काही वर्षात जागतिक दर्जावर नावलौकिक मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या २० वा स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए. मिलिंद काळे यांना कुलपती डॉ. संजय डी पाटील यांच्याहस्ते ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा २० वा स्थापना दिवस सोमवारी उत्साहात संपन्न झाला. सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठ प्रांगणात लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांच्या हस्ते ध्वजवंदन व त्यानंतर विद्यापीठ गीत झाले. कुलपती डॉ. संजय डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सीए मिलिंद काळे, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ व्ही व्ही भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एन सी सी कॅडेटने मानवंदना दिली.

हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात स्थापना दिनाच्या निमित्तान मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए. मिलिंद काळे यांना कुलपती डॉ. संजय डी पाटील यांच्याहस्ते ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, ॲडव्हायझर सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, सीए मिलिंद काळे, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ व्ही व्ही भोसले आदी उपस्थित होते. यावेळी सीए मिलिंद काळे व लेफ्टनंट जनरल डॉ. भूपेश के गोयल यांच्या जीवनप्रवास व विद्यापीठाच्या प्रवासावरील चित्रफित दाखवण्यात आली.

यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल म्हणाले,
युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि सशक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी शिक्षणाचे अमूल्य योगदान आहे. विद्यार्थी हीच देशाची शक्ती असून उत्तम शिक्षण, नव तंत्रज्ञान, संशोधन यांच्या जोडीने चांगले संस्कार या माध्यमातून युवा पिढीला कर्तृत्वशील बनवल्यास देश महासत्ता बनेल. हेच कार्य डी वाय पाटील विद्यापीठ उत्तम प्रकारे करत असल्याचे गौरवउद्गारही त्यांनी काढले.

डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, विद्यापीठाला नॅक ए प्लस प्लस आणि क्यू एस आयगेज डायमंड मानांकन
मिळाले आहे. यातून विद्यापीठाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. यापुढे जागतिक क्रमवारीसाठी आम्ही प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षात जगातील सर्वोत्तम विद्यापीठामध्ये स्थान मिळवण्याचे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मि‍लींद काळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना अतिशय आनंद होत आहे. कॉसमॉस बँक आणि मि‍लींद काळे यांचे जुने ऋणानुबंध असल्याचे सांगत काळे यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मि‍लींद काळे यांनी, सन्मानाला उत्तर देताना
डी वाय पाटील विद्यापीठाने दिलेली कौतुकाची थाप आणखी जबाबदारी वाढवणारी आहे. पाटील कुटुंबाने राज्यभर शिक्षणाची वनराई तयार केली आहे. 40 – 50 वर्षापूर्वी शिक्षणातील बदलती ओळखून डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाची ज्ञान गंगा आणली.

*पुरस्काराची रक्कम संशोधनासाठी*
काळे म्हणाले, आपल्या आयुष्यातील हा प्रथमच अर्थिक पुरस्कार आहे.शेती व शेतकऱ्याची प्रगती झाली तरच आपणं पुढें जाऊ शकतो. यासाठी पुरस्काराचे एक लाख रूपये आणि आपल्याकडील एक लाख रूपये असे दोन लाख रूपये डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठातील रिसर्च साठी देण्याचे त्यांनी जाहीर केलं.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी,
डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. अजित पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अर्पिता पांडे – तिवारी, प्रा. मैथिली पाटील, प्रा.स्नेहल शिंदे यांनी केले.

यावेळी माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, डॉ माणिकराव साळोखे, डॉ. विलासराव साळोखे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे व संचालक मंडळ, आर्मी अधिकारी, डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डीचे कुलगुरू प्रा. मनीष भल्ला, शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पी एस पाटील, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता,डी वय पाटील अभिमत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अभय जोशी, आयक्युएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, सी.एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, डॉ. अद्वैत राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ . वैशाली गायकवाड, मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. आर. बी. नेरली, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अजित पाटील, डॉ. अमृतकूवर रायजदे, डॉ. उमाराणी जे., डॉ. आर. एस. पाटील, रुधिर बार्देस्कर, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशिल इंगळे यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, सत्कारमूर्ती व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते

कोल्हापूर: मिलिंद काळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना डॉ. संजय डी. पाटील. समवेत सौ. काळे, लेफ्टनंट जनरल डॉ. भूपेश के गोयल, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, डॉ. आर. के. शर्मा, डॉ व्ही व्ही भोसले,


Spread the news

You may also like

error: Content is protected !!