महेंद्र ज्वेलर्सतर्फे सुवर्ण, हिरे दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी
कोल्हापूर : येथील १२० वर्षांची सुवर्ण परंपरा जपणारे व पश्चिम महाराष्ट्रातील हॉलमार्क मानांकन प्राप्त करणारी पहिली सुवर्णपेढी म्हणून ओळखले जाणारे महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी यांनी ग्राहकांसाठी खास सणासुदीच्या निमित्ताने सुवर्ण व हिरे दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी बाजारात आणल्या आहेत.
दागिन्यांच्या मजुरीवर थेट २० टक्के मेगा सूट देण्यात आली आहे. दागिन्यांच्या मजुरीवर ही ऑफर लागू आहे. यावर्षी खास मंगळसूत्र, बांगडी पाटली, नेकलेस, चेन, अंगठ्या, टॉप्स यांसह लाईट वेट ब्रायडल सेट, अँटिक, टेम्पल, कलकत्ता, राजस्थानी, कारवारी, साऊथ इंडियन, पोलकी, कुंदन, दुबई व इटालियन डिझाईन्स तसेच कोल्हापुरी साज, ठुशी, वज्रटीक, मोहनमाळ, बोरमाळ, बकुंळीहार, पोहेहार, बुगडी, शिंदेशाही तोडे अशा विविध दागिन्यांची विशेष व्हरायटी उपलब्ध आहे.
हिऱ्यांच्या दागिन्यांमध्येही नेकलेस, बांगडी, जेंट्स-लेडीज ब्रेसलेट, टॉप्स, मंगळसूत्र पेंडंट यांचा समावेश असलेली आकर्षक श्रेणी दाखल झाली आहे. चांदीच्या मजुरीवर ३० टक्केपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पूजा साहित्य, चौरंग, तामण, समई, निरांजन, पंचपात्र, तांबे भांडी, देवदेवतांच्या मूर्ती, पाण्याचे जार, ड्रायफ्रूट बॉक्स तसेच अँटिक पॉलिशमधील चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. ही ऑफर वाढवून २० सप्टेंबरपर्यंत लागू आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन महेंद्र ज्वेलर्सकडून आहे. “




