Spread the news

*टीईटी संदर्भात केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी दिले केंद्रीय शिक्षण मंत्री नाम . धर्मेंद्र प्रधानजी यांना निवेदन* : भरत रसाळे­­

 

 

  •  

कोल्हापूर : ज्यांची सेवा पाच वर्ष शिल्लक राहिलेली आहे त्यांना सोडून उर्वरित सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासंबंधीचा निकाल सुप्रीम कोर्टाने याचिका क्रमांक 1385 /2025 दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेला आहे .हा निर्णय संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण करणारा असलेने भारत सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचीका दाखल करावी व सरसकट सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्यासंबंधी दिलेल्या निर्णयावर पुर्नविचार करून टीईटीची अट शिथिल करावी अशा प्रकारची मागणी भारत सरकारने सुप्रीम कोर्टाकडे करावी अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री नाम . धर्मेंद्र प्रधान जी यांना दिल्याची माहिती समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली .
नाम . धर्मेंद्र प्रधानजी
यांना निवेदनात म्हटलेले आहे की, लाखो शिक्षकांच्या सेवा या पंचवीस तीस वर्षे पेक्षा जास्त झालेल्या आहेत .हे सर्व शिक्षक तत्कालीन सेवाशर्ती
नियमावली मधील तरतुदी नुसारच सेवेमध्ये दाखल झालेले आहेत . त्यांना या वाढत्या वयामध्ये ,अभ्यासाची उच्च काठीण्यपातळी असलेली टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्यास सांगणे हे संभ्रम निर्माण करणारे व शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण करणारे आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करून टीईटी 2009 कायदा हा सन 2011 मध्ये लागू झाल्यानंतर जे शिक्षक सेवेत आले त्यांना TET उतीर्ण होणे अनिवार्य करावे व अन्य शिक्षकांच्या साठी ही अट शिथिल करावी . TET उतीर्ण होण सक्तीचे केले तर प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक शिक्षकांना नोकरीच्या बाहेर जावे लागेल व त्यांच्या कुटुंबाचे व शिक्षकांचे मानसिक आर्थिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडेल .तेव्हा यासंबंधी सुप्रीम कोर्टाला पुर्नरविचार करण्याची विनंती करावी अशा मागणी या निवेदनाद्वारे माननीय शिक्षण मंत्री यांना केलेली आहे .निश्चितच याबाबत केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल व शिक्षकांना न्याय मिळेल असा विश्वास समितीचे राज्याध्यक्ष .भरत बा रसाळे यांनी व्यक्त केला .
.. .


Spread the news

You may also like

error: Content is protected !!