*डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या*
*विद्यार्थ्यांची सामजिक बांधिलकी*
-कोर्ट परिसरातील रस्त्यावर पसरलेली धोकादायक खडी केली साफ
-बावडा रेस्क्यू फोर्स, राजाराम बंधारा ग्रुप सोबत स्वच्छता मोहीम
कोल्हापूर :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकण्यात आलेली धोकादायक खडी दूर करत कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या एन. एस. एस. विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. जिल्हा सत्र न्यायालय जवळील गंगा भाग्योदय हॉल परिसरातील या खडीमुळे होणारा अपघाताचा धोका लक्षात घेत विद्यार्थ्यांनी बावडा रेस्क्यू फोर्स व राजाराम बंधारा ग्रुप यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवत रस्ता धोकामुक्त केला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने उपाययोजना राबवण्यात आल्या. या परिसरात खड्डयामध्ये खडी टाकण्यात आल्याने जिल्हा सत्र न्यायालय जवळील गंगा भाग्योदय हॉल परिसरातील रस्ता दुचाकीसह अन्य वाहनासाठी अपघाताला निमंत्रण देणारा बनला होता. काही गाड्या देखील घसरल्या होत्या.
त्यामुळें बावडा रेस्क्यू फोर्स व राजाराम बंधारा ग्रुप यांच्या सहकार्याने ही धोकादायक खडी दूर करत, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवत रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला.
या मोहिमेत प्रदीप उलपे, मानसिंग जाधव, निशिकांत कांबळे, जितू केंबळे, युवराज उलपे, कृष्णात घोडके, संग्राम जाधव, नितीन माने, प्राचार्य महादेव नरके, प्रा. विशाल शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी सक्षम गुप्ता, साहिल गोडे, अथर्व टिके, अभिराज हाक्के, स्वरूप चोगुले, आर्यन पाटील, उत्कर्ष चौगुले, वैष्णवी वांगळे, पूर्वा तोडकर आदी विद्यार्थ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, बावडा रेस्क्यू फोर्स व राजाराम बंधारा ग्रुपचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे अपघाताचा धोका टळला असून, परिसरातील नागरिक व वकील बांधवांकडून या उपक्रमाचे मनापासून स्वागत करण्यात आले.
कोल्हापूर: बावडा रेस्क्यू फोर्स व राजाराम बंधारा ग्रुप सदस्यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवताना डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक चे विद्यार्थी विद्यार्थिनी.