- शिवसेना जिल्हाप्रमुखपदी विजय बलुगडे
कोल्हापूर : तुरंबे (ता. राधानगरी) येथील माजी उपसरपंच, राधानगरी तालुका शिवसेनाध्यक्ष विजय रघुनाथ बलुगडे यांची कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाली. यानिमित्ताने प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मोठी संधी मिळाल्याने मतदार संघात विशेष कौतुक होत आहे
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे ते खंदे समर्थक आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बलुगडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
निवडीनंतर तुरंबे येथील सिद्धिविनायक मंदिरात नूतन जिल्हाप्रमुख विजय बलुगडे यांचा माजी सरपंच अशोकराव फराकटे, विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर तुरंबे गावातून प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. शिवसेनेच्या वाढीसाठी आपण आत्तापर्यंत भरपूर प्रयत्न केले यापुढेही आपले प्रयत्न असेच सुरू राहतील अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली