जीएसटी कपातीनंतर माई ह्युंदाईमध्ये ग्राहकांची गर्दी. फॅमिली कार्सच्या किमतीत मोठी घट..
केंद्रातील एनडीए सरकारने मध्यमवर्गीयांना दिवाळीच्या मुहूर्तावर एक मोठी भेट दिली आहे. जीएसटी परिषदेने अनेक वाहनांवरील २८ टक्के जीएसटी दर १८ टक्क्यांवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, हा बदल येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे फॅमिली कार्सच्या किमतीत लक्षणीय कपात होणार असून दसऱ्याच्या आधीच ह्युंदाई कार्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. माई ह्युंदाई शोरूम्समध्ये या घोषणेनंतर ग्राहकांची लगबग सुरू झाली असून कार खरेदीच्या विविध योजनांबाबत चौकशी वाढली आहे.
जीएसटी कपातीचा हा निर्णय वाहन उद्योगासाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी फॅमिली कार्स खरेदी करणे आता अधिक सोपे आणि परवडणारे होणार आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार विविध मॉडेल्सच्या किमतीत ७० हजार रुपयांपासून ते ४.५० लाख रुपयांपर्यंत बचत होणार आहे.
माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी सांगितले की, जीएसटी कपातीमुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. आम्ही यानिमित्ताने कार एक्सचेंज ऑफर्स, कमी व्याजदरातील लोन सुविधा आणि इतर विशेष योजना सुरू केल्या आहेत. दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. ग्राहकांनी लवकरात लवकर माई ह्युंदाईच्या कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शोरूमशी संपर्क साधावा, असे आवाहन तेज घाटगे यांनी केले आहे.