*रविकिरण इंगवले म्हणजे “कोल्हापुरातील पिचकुले”; शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांचा टोला*
ज्याचे उभे आयुष्य गुंडगिरी, तोडपाणी, घोडेबाजार यात गेले अशा उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले याने जिल्ह्यातील लोकनेत्यांवर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करणे म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” आहेत. राजकीय स्टंटबाजीतून बदनामीकारक वक्तव्ये इंगवले यांच्याकडून वारंवार करण्यात येत असून, इतर काही कामधंदा नसलेल्या बिनकामी जिल्हाप्रमुखाकडून निव्वळ प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये केली जात आहे. वर्षानुवर्षे बाप बदलन्याच काम करणाऱ्या व्यक्तीकडून अशाच स्टंटबाजीची अपेक्षा असते. रविकिरण इंगवले यांची वक्तव्ये वैफल्यग्रस्तातून होत असून, त्यांना “मेंदू” विकार तज्ञाकरवी चांगल्या डोस ची आवश्यकता आहे.
कोल्हापूर शहराची अस्मिता असलेल्या गांधी मैदानाच्या कामासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.श्री.राजेश क्षीरसागर यांनी निधी मंजूर करून आणाला आहे. यासह शहरातील रस्त्यांसाठी सुमारे १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. ही कामे प्रगती पथावर असताना उगाचच आपल्या बगलबच्च्यांना घेवून आंदोलनाची स्टंटबाजी करायची हा एकमेव उद्योग उबाठाच्या अक्कलशून्य जिल्हाप्रमुखांकडे राहिला आहे. एकीकडे रस्त्यांची कामे तांत्रिक बाबी पूर्ण करूनच केली जावीत जेणेकरून पुन्हा रस्त्याचे काम करावे लागू नये अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार शहरात रस्त्यांची कामे तांत्रिक बाबी तपासून सुरु आहेत. हे देखील त्या बिनडोक जिल्हाप्रमुखांनी एकप्रकारे नकळत का होईना पण मान्य केले आहे. पण “उचलली जीभ लावली टाळ्याला” अशा पद्धतीने कोणतीही माहिती न घेता उठसुठ शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची अशीच कृत्ये चालू आहेत. ज्या पद्धतीने साताऱ्यातील “अभिजित बिचकुले” लोकांचे मनोरंजन करत असतो, त्याचप्रमाणे कोल्हापुरातील हा “पिचकुले” एक – दोन दिवसातून जनतेच्या मनोरंजनासाठी “बाईट” देतोच.
गांधी मैदानाच्या कामाचा विचार केला तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा.सुजित चव्हाण यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेवून सत्यपरिस्थिती जनतेसमोर मांडली आहे. परंतु, त्यांच्याविरोधातही दर्जाहीन टीका रविकिरण इंगवले यांनी केली. रविकिरण इंगवले हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून, हद्दपारी, खून, मारामाऱ्या यात त्याचे हात बरबटलेले आहेत, हे समस्त जनतेला माहित आहे. त्यामुळे त्याच्या टीकेला उत्तर न देता शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आपले जन हिताचे काम करण्यास प्राधान्य देतात. परंतु, “कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही” या प्रमाणे हा डोमकावळा कितीही “काव- काव” केला तरी त्याला भिक न घालता शिवसेनेचे जनहिताचे काम सुरूच राहील. यासह आगामी काळात कोल्हापुरातील “पिचकुले” रविकिरण इंगवले यांनी शहरवासियांमध्ये गैरसमज निर्माण करणारी तसेच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावे, असा इशारा आम्ही देत आहोत.
या पत्रकार परिषदेस उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, युवासेना उपशहरप्रमुख अमृत परमणे उपस्थित होते.