भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने युवा, महिला, ओ.बी.सी. आणि अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी निवडी उत्साहात संपन्न

Spread the news

भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने युवा, महिला, ओ.बी.सी. आणि अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी निवडी उत्साहात संपन्न
कोल्हापूर दि. भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर महानगर जिल्ह्याच्या वतीने नुकत्याच जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि प्रमुख ५ मोर्चांच्या अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. आता संघटनात्मक पदाधिकारी निवडींचा पुढील टप्पा मोठ्या उत्साहात पूर्ण झाला आहे. आज भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओ.बी.सी. मोर्चा आणि अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि सकारात्मक वातावरण दिसून आले, अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरी फेटे बांधून आपला आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाची सुरुवात पवित्र भारतमाता पूजनाने करण्यात आली. याठिकाणी युवा मोर्चाच्या ३५, महिला मोर्चा ४५, ओ.बी.सी.२५, अल्पसंख्यांक २५ इतक्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव व प्रदेश सचिव महेश जाधव यांनी, आगामी महापालिका निवडणुकांसाठी आजपासूनच सर्वांनी सज्ज होऊन आपल्या प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी जोमाने कार्यरत रहावे असे आवाहन सर्वान केले. या निवडींमुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून ‘अंत्योदया’च्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याच्या भाजपाचा प्रत्यन आहे. पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रावर आधारित देशाच्या विकासाची गंगा घराघरात पोहचवण्याचा विश्वास याप्रसंगी उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.
याप्रसंगी युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. माधुरी नकाते, ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष महेश यादव आणि अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष आजम जमादार यांच्यासह विराज चिखलीकर, सौ. धनश्री तोडकर, गणेश देसाई, गायत्री राऊत, राजसिंह शेळके, उमाताई इंगळे, रुपारानी निकम,डॉ राजवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!