लिंगायत माळी समाज महिला मंडळातर्फे आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभ

Spread the news

लिंगायत माळी समाज महिला मंडळातर्फे आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

 

 

  •  

घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभ

कोल्हापूर

लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ, आदर्श सासू-सून पुरस्कार वितरण व गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्ह्णून डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे ह्यूमन रिसोर्स अॅन्ड ऑपरेशनचे प्रमुख श्रीलेखा साटम तसेच प्रा. नितीन माळी हे उपस्थित होते.

लिंगायत माळी समाजाने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांघिक व वैयक्तिक स्वरूपात विविध स्पर्धा घेतल्या. झिम्मा फुगडी स्पर्धेत मौजे सांगाव प्रथम, कुरूंदवाड व्दितीय तर कुंभोजच्या ग्रुपने तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले. वैयक्तिक स्पर्धेत हे विजते ठरले. यांना माजी महापौर रामाणे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. समाजातील सौ. उषा मुकुंद माळी व सौ. पूजा अनंत माळी यांना आदर्श सासू व सून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गणेशोत्सवानिमित्त लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमास सहकार्य करणारे सी. एम. माळी व संतोष माळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रारंभी महिला संघटनेच्या अध्यक्षा वंदना माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सौ. रामाणे, सौ. साटम व प्रा. माळी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन संतोष माळी व जर्नादन महाडिक, नम्रता सुतार यांनी केले. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षा वैशाली माळी, कार्याध्यक्षा विद्या माळी, माजी अध्यक्षा मिनाक्षी माळी, साधना माळी, माळी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष माळी, ज्येष्ठ संचालक तानाजी माळी, राजाराम माळी यांच्यासह संचालक व समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते. शेवटी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!