वनौषधी दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन
वनौषधी प्रसारामध्ये गेली 35 वर्षे सातत्याने प्रसिद्ध होणाऱ्या “वनौषधी” दिवाळी विशेषांकाचे मोठे योगदान आहे असे उद्गार सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ प्रदीप पवार यांनी काढले. वनौषधी दिवाळी अंकाच्या प्रकाशना च्या वेळी ते बोलत होते ,ते पुढे म्हणाले की डॉ. सुनील पाटील यांनी 35 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा ज्ञान यज्ञ सातत्य टिकवून आहे महाराष्ट्रातील बारा कोटी मराठी वाचक ,एवढेच नव्हे तर जगभरातील मराठी वाचक या दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पाहत असतात, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. रावसाहेब पाटील यांनी, दिवाळी अंक ही आपली साहित्य परंपरा आहे ,असे सांगून एका विशिष्ट विषयाला वाहिलेला असा वनौषधी दिवाळी अंक वाचकांच्या आरोग्य विषयक शंकांचे समाधान करतो असे मत मांडले .प्रारंभी धन्वंतरी पूजन करून संस्थापक संपादक डॉ. सुनील पाटील यांनी वनौषधीच्या निर्मितीचा इतिहास सांगून स्वागत प्रास्ताविक केले, साहित्यिक संजय कात्रे यांनी आपल्या भाषणात या विशेष अंकास शुभेच्छा दिल्या, संपादक डॉ. प्रणव पाटील यांनी आभार प्रदर्शन केले डॉ. शरयू पाटील यांनी सूत्रसंचालन केले या समारंभासाठी वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते




