*मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कागलमध्ये साकारले आकर्षक सेल्फी पॉइंट्स*
*कचरा ढिगांच्या जागी साकारले सेल्फी पॉईंट्स*
*विभागनिहाय वैशिष्ट्यांची ओळख होतेय अधोरेखित*
*कागल, दि. २५:*
कागल शहरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी व शहर स्वच्छ राहण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने ठिकठिकाणी आकर्षक सेल्फी पॉइंट्स साकारण्यात आले आहेत. यापूर्वी कचऱ्याचे ढीग साचणाऱ्या पाच ठिकाणी हे साकारण्यात आले आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ राहण्यासही मदत होणार आहे. या उपक्रमामुळे शहराला एक नवे सौंदर्य लाभले आहे.
शहरातील प्रत्येक विभागातील सामाजिक, सांस्कृतिक, तसेच ओळख दर्शवणारे घटक लक्षात घेऊन हे सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले आहेत. ज्या भागात ज्या समाजाचे, संघटनेचे किंवा स्थानिक परंपरेचे प्राबल्य आहे, त्याच्याशी निगडित संदेश आणि प्रतीकात्मकता या सेल्फी पॉईंट्समध्ये दिसते. ज्या ठिकाणी कचरा पडतो व अस्वच्छता असते अशी ठिकाणे निवडून हे सेल्फी पॉईंट उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ राहण्यासाठीही मदत होणार आहे.
या उपक्रमातून कागलची सामाजिक एकता, प्रगतीशील विचार आणि सौंदर्यदृष्टी अधोरेखित झाली आहे. विविध रंगसंगती, आकर्षक लाईटिंग, स्थानिक घटकांचा वापर आणि जनसंपर्क वाढविणारी रचना यामुळे हे ठिकाण आता नागरिकांचे आवडते “फोटो स्पॉट” ठरणार आहेत. नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या या सेल्फी पॉईंट्समुळे कागल शहर अधिक आकर्षक बनले आहे.
………
१. कागल – वाय . डी . माने शिक्षण संकुलला जाणाऱ्या रोडवर उभारण्यात आलेले मुले अभ्यास करतानाचा सेल्फी पॉईंट्स .
२. कागल – येथील स्मशानभूमी जवळ लहानपणापासूनचे आयुष्य अधोरेखित करणारा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे .
३. कागल – रिंग रोडवर माधव हॉस्पिटल जवळ स्वच्छतागृहाच्या समोर असा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे .
४. कागल – एमआयडीसी रोडवर पसारेवाडी जवळ असा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे .
५. कागल- मुरगुड रस्त्यावर वड्डवाडीजवळ उभारलेला हा सेल्फी पॉइंट.
==========




