नदी काठावरील पूरग्रस्त भागातील गावांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापुर
जिल्हयातील पुग्रस्त नागरिक यांच्या माध्यमातुन आपल्या विभागाकडे कोल्हापुर जिल्हयातील नदी व नदी काठच्या परिसरातील निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थिती आणि त्यावर उपाययोजना करण्याची सर्व पुरबाधीत शहरातील व गावातील पुग्रस्ताच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले
कोल्हापुर जिल्हयातील प्रमुख नद्या विषेशतः पंचगंगा, दुधगंगा व वारणा आदि या नद्यामुळे प्रति वर्षी पुराची प्रचंड महाभयानक परिस्थिती निर्माण होत आहे. यामध्ये पिकांचे जनावर, घराचे, रस्ते याचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी जलप्रदूषण सारख्या समस्या निर्माण होत आहेत. याचे परिणाम शेतकऱ्यांचे क्षेत्र जलमय होऊन पिंकाचे नुकसान होत आहे, तसेच ग्रामस्थांची व शहरातील लोकांचे घराचे, जनावरे व रस्त्याचे नुकसान होत आहे. नदीला येणाऱ्या या पुरामुळे परीसंस्थेवर खोल परिणाम होत आहे. आणि याच कारणामुळे पुखस्त भागातील लॉकाचे होणारे नुकसान हे शासनाला दयावे लागत आहे.
शासनाकडुन मागवलेल्या माहितीनुसार २०१४ पासुन नदीतील गाळ उपसा झालेला नाही. यामुळे नदीची पात्र व नद्यांची खोली ही अरुंद होत चालली आहे.
नद्यांमध्ये गाळ जमणे हे पुरपरिस्थिती वाढवणारे एक महत्वाचे कारण असू शकते. म्हणून गाळ उपसा करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे नदीची जलवाहन क्षमता वाढू शकते.
नद्यांमध्ये गाळ जमणे हे पुरपरिस्थिती वाढवणारे एक महत्वाचे कारण असू शकते. म्हणून गाळ उपसा करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे नदीची जलवाहन क्षमता वाढू शकते. नदीतील गाळ उपसामुळे सध्या ४० ते ४७ फुटावर जाणारी पाण्याची पातळी ही कमी होवून पूर कमी होण्यास मदत होईल. गाळामुळे नदीतील जलसाठ्याचा मार्ग रोखला जातो. आणि जलाशयामध्ये पाणी साठा वाढू शकतो. परिणामी नदी मधून प्रवाह गतीशील होईल ज्यामुळे नदीतील पाणी जलद बाहेर पडेल. त्यासाठी योग्य यांत्रिकी साधनाचा वापर करून नदीतील गाळ उपसा करावा. गाळ उपसा करत असताना पर्यावरणाचा समतोल राखत गाळ उपसा करावा.
यावेळी संजय पवार वाईकर, तात्यासो पाटील भीमराव पवार विद्यानंद जिरगे बाळासाहेब पवार शिवाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते



