शिक्षकांचा पगार थांबवल्यास तीव्र आंदोलन

Spread the news

कोल्हापूर दि. ३१ : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एक तारखेला पगार होणे अपेक्षित असताना कोल्हापूर जिल्ह्यात सह राज्यातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे पगार न करण्याचा निर्णय राज्यातील सर्व माध्यमिक प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी घेतला आहे.

­

 

नवीन वर्षात शिक्षकांचे पगार थांबवू नका अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

  •  

राज्यातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शिक्षणाधिकारी यांच्यावर कार्यवाही होत आहे. सदरची कार्यवाही चुकीच्या पद्धतीने होत असल्याचं मत राज्यातील राजपत्रित अधिकारी संघटनेचे आहे.या कारवाईच्या निषेधार्थ राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे पगारावर सही न करण्याचा निणर्य घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील सर्वच प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचे नवीन वर्षात पगार रखडणार आहे. शिक्षकांचे पगार थांबवणे हे बाब शिक्षकांच्यावर अन्यायकारक असून तात्काळ शिक्षकांचे पगार करावेत, पगार वेळेत न झाल्यास अनेक शिक्षकांनी घर बांधकाम,फ्लॅट खरेदी,मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे लग्न समारंभ, दीर्घ आजारपण अशा विविध कारणांसाठी विविध पतसंस्था व बँकातून कर्जे घेतले असल्यामुळे सदर बँकांचे ई.एम.आय. ( हप्ता ) दिलेल्या तारखेत न भरलेस त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे व जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील यांनी दिला आहे.
यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील,महिला जिल्हाध्यक्ष गिरीजा जोशी, जिल्हा सचिव नितीन पानारी, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, शहराध्यक्ष संतोष पाटील, शहर सचिव गणेश घनवट, महिला कार्याध्यक्ष मिनाज मुल्ला, विद्या बारामते यांच्यासह धीरज पारधी, गौतम कांबळे, धनंजय शिंदे, दशरथ कुंभार, संदिप डवंग, अजित मोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोन्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!