*निवडणूक आयोगाच्या अधीन राहून देखील स्थानिक प्रशासनाने इतर ठराविक पक्षांच्यावर अन्याय केला-ॲड. अनिल घाटगे*
निवडणूक आयोगाची आचारसंहिता पाळून पदयात्रा, कोपरा सभा घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्याचबरोबर मोठ्या व सत्ताधारी पक्षांना रॅलीला परवानगी देण्यात आली. परंतु आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तर्फे खासदार अमोल कोल्हे यांच्या मोटार सायकल फेरीला परवानगी नाकारण्यात आली. सरळ सरळ यावरून असे दिसते की ठराविक पक्षांना दाबण्याचाच हा प्रकार आहे. सत्ताधारी मोठ्या पक्षांना बाकी प्रचंड मोठ्या रॅलीला परवानगी दिलीच व त्यांना पोलीस संरक्षण ही देण्यात आले हे कितपत योग्य आहे. लोकशाहीमध्ये सर्वांनाच समसमान न्याय मिळणे हे संविधानानुसार अधिकार असताना देखील स्थानिक अधिकारी यांनी ही गळचेपी केली आहे. आम्हाला निवडणूक उमेदवाराकडून बरेच फोन प्राप्त झाले की आम्हाला कोपरा सभा घेण्यासाठी सुद्धा परवानगी दिली जात नाही कारण नसताना वेगवेगळे कागदपत्र मागून त्रास देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 13 जानेवारी 2026 रोजी खासदार अमोल कोल्हे यांच्या मोटरसायकल रॅलीला सरळ सरळ पोलीस खात्याचे नाव सांगून परवानगी नाकारण्यात आली व तसे लेखी पत्र दिले. संपूर्ण शहराच्या परवानगीसाठी एकत्रित एक खिडकी योजना हवी होती. परंतु स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रभाग कार्यालयात पक्षांना फिरवायला लावून एक प्रकारे चुकीचा पायंडा पाडला आहे हे योग्य नाही संपूर्ण शहराची परवानगी एकाच ठिकाणी असायला हवी होती. आज पर्यंतच्या निवडणुकीमध्ये असे कधीही घडलेले नाही. राज्य निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टींची गंभीर दखल घेऊन एकाला एक न्याय व दुसऱ्याला एक न्याय देणाऱ्या स्थानिक प्रशासनाला योग्य ती समज देऊन कारवाई करावी आम्ही सर्व कागदपत्रे घेऊ लवकरच राज्य निवडणूक आयोगा कडे तक्रार दाखल करणार आहोत. असे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्याध्यक्ष ॲड. अनिल घाटगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.



