*राज्यातील कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे GST माफ करणे व सर्व वित्तीय संस्था यांचे कडील त्यांनी व्यवसाय साठी घेतलेले कर्ज माफ करणे
कोल्हापूर ,प्रतिनिधी
राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना ची देशाचे अर्थमंत्री व महाराष्ट्र चे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कडे लिखित स्वरूपात मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,*गेल्या जवळपास १५ ते २० महिन्यांपासून राज्यातील* सर्व विभागाकडील विकासाची कामे करणारे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे त्यांनी राज्यातील विकासाची कामे केलेल्या कामांचे देयके ( Bills) शासन वेळोवेळी देऊ शकत नाही,तसेच नवीन जवळपास एक ते दीड वर्षापासून राज्यातील सर्व विभागातील विकासाची कामे ही निघत नाही, यामुळे राज्यातील जवळपास ३ लक्ष छोटे मोठे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचा लघु उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत,यांनी सदर कामे करण्यासाठी वित्तीय संस्था कडुन कर्ज घेतले आहेत ,त्यांचे व्याज व हप्ते भरणे अवघड झाले आहे.
- *तसेच देयके फार तुटपुंज्या रक्कम मध्ये भरपुर कालावधीत शासनाकडून दिले जात आहे*, सदर रक्कम कामावरील खर्च, कामगार मजुरी, दुकानातुन माल घेतलेले त्यांचे देणे,व घराचा प्रापंचिक खर्च व इतर सर्व घटक यांचे सोपेस्कर करणे यात अक्षरक्ष कंत्राटदार यांचा जीव मेटाकुटीला आला आहे यासाठीच महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना चे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांनी देशाचे केंद्रीय अर्थमंत्री मा निर्मला सितारामणजी,राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद फडवणीससर, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या लिखित स्वरूपात संघटनेच्या निवेदनाद्वारे राज्यातील कंत्राटदार यांची या १८ ते २० महिन्यांपासून ची जी देयके मिळाली आहे त्यांची GST माफी व व्यवसाय साठी काढलेले सर्व वित्तीय संस्था यांचे कर्ज तातडीने माफ करावे.भारत स्वतंत्र झाल्यापासुन अनेक मोठे उद्योग व उद्योजक,शेतकरी तसेच इतर घटकांना वेळोवेळी ही शासनाने कर्जमाफी जाहीर केले आहे व दिली ही आहे ,आता छोटे कंत्राटदार व लघु उद्योजकांना व राज्याचे विकासासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे घटकांना GSTमाफी व वित्तीय संस्था ची कर्ज माफी करून न्याय द्यावा असे श्री मिलिंद भोसले यांनी दोन्ही सरकार कडे विनंती केली आहे.



