*कोल्हापूरकरांनी केवळ सत्तांतरच केले नाही, तर भविष्यातील आधुनिक आणि सुसज्ज कोल्हापूरच्या संकल्पनेवर विश्वास दाखविला : आमदार राजेश क्षीरसागर*
कोल्हापूर दि. १६ : देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुती सोबत आहे. गेली ५ वर्षे शहरात महायुतीच्या माध्यमातून विकासाचे वारे वाहत आहे. हे मतदारांनी देखील मान्य केले आहे. कोल्हापूरकरांनी केवळ सत्तांतरच केले नाही, तर भविष्यातील आधुनिक आणि सुसज्ज कोल्हापूरच्या संकल्पनेवर विश्वास दाखविला, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
महायुतीच्या स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय संपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिकांनी जल्लोष केला. या जल्लोषात आमदार राजेश क्षीरसागर सहभागी झाले. यावेळी नवनियुक्त नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी आमदार राजेश क्षीरसागर आणि आई वैशाली क्षीरसागर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसैनिकांनी आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर यांना खांद्यावर उचलून विजयाचा गुलाल उधळला. यावेळी नवनियुक्त नगरसेविका मंगलताई साळोखे, नगरसेविका दीपा ठाणेकर, नगरसेवक विशाल शिराळे, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेविका शिला अशोक सोनुले हेही विजयोत्सवात सहभागी झाले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि झालेली विकासकामे यामुळे जनतेने महायुतीलाच साथ दिली. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न शिवसैनिकांनी पूर्ण केले. विधानसभेला पेठा कुणाच्या तर शिवसेनेच्या हे नागरिकांनी दाखवून दिले होते. आताही पेठा या महायुतीच्याच असल्याचे सिद्ध झाले. शिवसेनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संधी मिळाली असून, कोल्हापूरच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीचे सर्वच नगरसेवक कटिबद्ध असतील. महायुतीला सत्तेपर्यंत पोहचविल्याबद्दल व सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल शहरवासियांचे मनपूर्वक आभारही त्यांनी मानले.
चौकट :
*”कोल्हापूर कस्स… लाडक्या बहिणी म्हणतील तस्सच”; शिवालयासमोर महिलांची लक्षवेधी घोषणाबाजी*
कॉंग्रेसने काढलेल्या घोषणेची खिल्ली उडवत लाडक्या बहिणीनी “कोल्हापूर कस्स.. लाडक्या बहिणी म्हणतील तस्सच” अशा घोषणा देत शिवालय येथे शेकडोच्या संख्येने उपस्थित महिलांनी लक्षवेधी घोषणाबाजी केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, दिशा क्षीरसागर, पूजा क्षीरसागर यांनी महिलांच्या समवेत फुगडी खेळून लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणीत केला.
फोटोओळ – शनिवार पेठ शिवालय येथे विजयी जल्लोषात सामील झाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका मंगल साळोखे, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, दिशा क्षीरसागर , पूजा क्षीरसागर यांनी विजयाची खुण दाखवून गुलाल उधळला. यावेळी शिवसेना महायुती पदाधिकारी, शिवसैनिक, लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



