विविध सेवाभावी संस्थांच्यावतीने एकदिवशीय देहांगदान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
—————————————-
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील राजर्षी शाहू सिनेट सभागृहात फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, यशोदर्शन फाउंडेशन, शिवाजी विद्यापीठ एनएसएस विभाग, झेडटीसीसी पुणे, दोस्त मुंबई, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, ॲस्टर आधार हॉस्पिटल यांच्यावतीने तसेच देहांगदान जीवनदायी समाजसेवी संस्था, ऑर्गन्स फाउंडेशन, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, जागृत नागरिक सेवा संस्था, प्रज्ञा शिक्षण प्रतिष्ठान, स्नेहबंधन ट्रस्ट मुंबई, विंग ऑफ हार्ट फाउंडेशन आदी. सेवाभावी संस्थांच्या पुढाकाराने मासिक शिखरावरीच्या दशकपूर्ती निमित्ताने अवयवदान – देहदान चळवळीतील कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळा 2026 दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत राज्यातील तज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली.
यावेळी अवयवदानाची आज गरज का आहे ?
कॉमा, मेंदू मृत व नैसर्गिक मृत्यू म्हणजे काय ?
अवयवदानानंतर अवयव कधीपर्यंत वापरता येतात ?
सर्वच व्यक्ती अवयवदान करू शकतात का ?
एखादा रूग्ण मेंदू मृत घोषित झाल्यानंतरही त्याची जगण्याची शक्यता असते का ?
अवययदात्याच्या कुटुंबीयांना अवयव कोणाला दिले हे समजते का ?
अवयवदानामुळे अंत्यविधी किंवा दफनविधी वर कांही परिणाम होतो का ?
विविध धर्माचे अवयवदानाबद्दल मतप्रवाह काय आहेत ?
अवयवदानाबाबत आपण कोणत्या पद्धतीने योगदान देऊ शकतो ?
कोणते अवयवदान करता येऊ शकतात ?
आपण अवयवदाता कसे होऊ शकतो ?
अवयवदान व देहदान याबद्दल समाजाची मानसिकता, अंधश्रद्धा, समज – गैरसमज, रुढी, परंपरा आदी.
कोणते अवयव कधी दान करता येतात ?
आपण अवयवदाता कधी होऊ शकतो ?
अवयवदान व देहदान केल्यामुळे समाजाचा, पर्यायाने देशाच्या विकासात योगदान देता येते का ?
भारतातील अवयवदान व देहदान याबाबतची सध्याची स्थिती.
अवयवदान व देहदान काळाची गरज का आहे ?
अवयवदानाचे प्रकार कोणते ?
कोणत्या प्रसंगी अवयवदान स्विकारले जात नाही ?
अशा विविध प्रश्नांची अभ्यासपूर्वक उत्तरे विविध उदाहरणांसह या एकदिवसीय राज्यस्तरीय शिबिरामध्ये देण्यात आली.
यावेळी वय, जात, धर्म, समुदाय, वर्तमान किंवा भूतकाळातील वैद्यकीय स्थिती विचारात न घेता आपण सर्वजण अवयवदाता असू शकतो. अशाप्रकारे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी
डॉ. मीरा सुरेश – मुंबई, डॉ. कैलास जवादे – मुंबई, डॉ. अमोल कोडोलीकर – कोल्हापूर, डॉ. कृष्णसिंग – कोल्हापूर, डॉ. दिलीप पटवर्धन – सांगली, श्रीकांत आपटे (काका) – पुणे, डॉ. योगिन गुर्जर – सोलापूर, डॉ. शिबा वाकडे – पुणे, डॉ. राजेश शेट्टी पुणे, डॉ. स्नेहल हंडे मुंबई, डॉ. राजेश डोके मुंबई आदी. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांकडून बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशोदर्शन फाउंडेशनचे प्रमुख योगेश अग्रवाल यांनी आयोजक या नात्याने स्वागत व प्रास्ताविक केले तर, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात उपस्थित सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. सर्वच पाहुण्यांचे रोपटे, मासीक शिखरावरी अंक, यशोदर्शन फाऊंडेशनचा वार्षिक अंक व वार्षिक दिनदर्शीका देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी गुणवंत कामगार संजय सासने, भगवान माने, महादेव चक्के तसेच डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, MSW सायबर कॉलेज कोल्हापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडापार्क कोल्हापूर, नर्सिंग कॉलेज CPR कोल्हापुर, NSS चे तीन जिल्ह्यातील कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.



