कोल्हापूर जि.प. कर्मचारी सोसायटीचे चेअरमन नंदिप मोरे; व्हाइस चेअरमन जयकुमार रेळेकर बिनविरोध

Spread the news

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप मोरे व व्हाइस चेअरमनपदी जयकुमार रेळेकर यांची बिनविरोध निवड झाली. सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक  शनिवारी 28 फेब्रुवारी 2026 रोजी झाली.

­

 

जिल्हा उपनिबंधक  चंद्रकांत इंगवले बैठकीचे अध्यक्ष स्थानी होते. चेअरमनपदासाठी  मोरे यांच्या नावाला संचालक श्रीकांत चव्हाण हे सूचक व  साताप्पा मगदूम यांनी अनुमोदन दिले.  व्हाइस चेअरमनपदासाठी  रेळेकर यांच्या नावाला संचालक सुनील पाटील हे सूचक तर संचालक रविद्र जरळी यांनी अनुमोदन दिले.  निवडीनंतर बोलताना चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने स उल्लेखनिय कारभार करत नावलौकीक मिळवले आहे. संस्थेने जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील कर्मचारी यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक उत्कर्ष करण्यामध्ये या संस्थेने नेहमीच मोलाचा हातभार लावलेला आहे. अशा या संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक गरूड झेप घेतली असून संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करण्यासाठी आम्ही सर्व संचालक व सुकाणू समिती कटिबध्द आहोत.” असे सांगितले.

  •  

निवडीवेळी संचालक सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहूलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, संजय शिंदे, बाजीराव पाटील, सरदार दिंडे, सरोजनी कोरी, सोनाली गुरव, तज्ञ संचालक दिपक बुरूड, अशोक पाटील उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकूरे, एम.एम. पाटील, के. आर. किरूळकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!