इचलकरंजी येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Spread the news

इचलकरंजी येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

­

 

        कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर व मॉडेल करिअर सेंटर, कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 10 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, दाते मळा, इचलकरंजी येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

  •  

             या रोजगार मेळाव्यामध्ये विविध पदांकरीता किमान 9 वी उत्तीर्ण, 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई, एमबीए तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.

            इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.i‍n आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 03  प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!