बांबू उद्योग परिषद-प्रदर्शन शनिवारपासून
कोल्हापूर : पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शनिवार (ता. २१) पासून दोनदिवसीय बांबू उद्योग परिषद व प्रदर्शन होणार आहे. शहाजी लॉ कॉलेज येथे कौन्सिल ऑफ एज्युकेशन, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मेमोरियल ट्रस्ट, पाटलोबा पाटील बांबू रिसर्च फाउंडेशन यांच्या ति संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन होईल. कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, बांबू रिसर्च फाउंडेशन संस्थापक पाटलोबा पाटील प्रकियांच्या उपस्थितीत प्रदर्शनाला प्रारंभ होईल. ग्रामीण भागातील शेतकरी, युवक तसेच उद्योजकांसाठी बांबू हा उत्पन्नाचा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे बांबू लागवड, प्रक्रिया उद्योग, उत्पादन निर्मिती आणि बाजारपेठ याबाबत संपूर्ण माहिती एका ठिकाणी मिळावी, या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
उद्योगाशी संबंधित विविध तंत्रज्ञान,
उत्पादन प्रक्रिया, उद्योजकतेच्या संधी, तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.







