शाहू मिल चौक अपघात प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
कोल्हापूर : शाहू मिल चौकात झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्युमुखी
पडलेल्या नागरिकांना सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व जनतेच्या वतीने बिंदू चौकामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी शाहू मिल परिसरात कारचालकाच्या बेपर्वाईमुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाला व दोन जण गंभीर जखमी झाले. गर्भवती अॅड. भाग्यश्री गवळी, दीपक वंशे या बाप-लेकीचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अपघात झाल्यानंतर त्यावेळी जिल्हा बार असोसिएशनने अपघातातील कारचालक आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, असा ठराव करूनही त्याचे वकीलपत्र घेतले गेले. याचाही निषेध करण्यात आला. यावेळी6 परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार, काँग्रेसचे अॅड. सुरेश कुराडे,and राष्ट्रवादीचे किसन कल्याणकर, किशोर घाटगे, संजय करजगार, प्रतिभा होगडे आदी उपस्थित होते.





