कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेचे सर्वप्रथम दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात

Spread the news

*कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेचे सर्वप्रथम दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात*

­

 

*मंत्री हसन मुश्रीफ यांची आढावा बैठकीत माहीती*

  •  

*५० किलोमीटर पानंदींच्या कामांना मिळणार प्रशासकीय मान्यता व निधी*

कागल, दि. २४:
मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते व पाणंद योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात मंजूर झाले आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत ५० किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते व पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मान्यतेसह निधी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यापैकी एका क्लस्टरमध्ये कागल तालुक्यातील २५ किलोमीटर लांबीच्या शेत व पानंद रस्त्यांचा समावेश आहे. तसेच; दुस-या क्लस्टरमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील साडेबारा किलोमीटर व आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील साडेबारा किलोमीटर अशा एकूण २५ किलोमीटर लांबीच्या शेत व पानंद रस्त्यांचा समावेश आहे.

मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कागल शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक झाली. या बैठकीत या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
​
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते व पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील किमान सात ते आठ क्लस्टर्सना मंजुरीसाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करीत आहोत. प्रत्येक क्लस्टरमध्ये २५ किलोमीटर शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचा समावेश होणार आहे. त्यापैकी; पहिल्या क्लस्टरमध्ये कागल तालुक्यातील २५ किलोमीटर शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचा समावेश आहे. दुस-या क्लस्टरमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील साडेबारा किलोमीटर लांबीचे शेतरस्ते व पाणंद रस्ते आणि आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शेतरस्ते व पाणंद रस्ते, असे २५ किलोमीटरचे मंजूर झालेले आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले​, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, ​गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे,​आजरा गटविकास अधिकारी सुभाष सावंत, ​गडहिंग्लजचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, ​उपविभागीय पोलिस अधीक्षक (गडहिंग्लज)सतीश होडगर, ​बळीराजा शेत पाणंद पारिसा जंगटे, गणपतराव सांगले, पांडुरंग तेलवेकर, ​बाबासाहेब सांगले, ​किशोर अहिरे, ​विजय शेळके, ​महेश मोहिते, ​अमित लोंढे, ​हरिश्चंद्र शितोळे, ​भूषण पाटील, एम. डी. सांगावकर, ​कल्याणी गोडसे, ​समीर खडकेवाले, ​महेश कुंभार, ​सुरज कुंभार, ​धनाजी मच्छेर, ​तेजस्विनी पवार, ​राहुल कुंभार, ​सचिन सावंत, ​विनायक कुलकर्णी, ​अश्विनकुमार कचरे, ​सी. ए. पाटील, ​अमित पाटील, ​महेश पवार, ​सुरेश बांदीवडेकर, ​पंडित कोडोलीकर, ​राजेंद्र गायकवाड, ​सतीश आणेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
………….

*कागल, गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील “मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते व पाणंद रस्ते योजना” समितीची बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कागल विश्रामगृहावर झाली. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले व अधिकारी वर्ग.*
=========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!