*खाजगी शिक्षक सेवक पतसंस्थेमार्फत मयत सभासदांच्या वारसांना रू. 15 लाखाची मदत*
*कोल्हापूर :-*
*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने मयत सभासद कुटुंब कल्याण ठेव योजनेतून मयत सभासद विजय शामराव कुरणे यांच्या वारसांना पंधरा लाख वीस हजार रु निधी वितरित करण्यात आला .हा कार्यक्रम पतसंस्थेच्या सभागृहामध्ये पार पडला.*
*पतसंस्थेच्या वतीने एक एप्रिल 20 24 पासून सभासद कुटुंब कल्याण योजनेची सुरुवात करण्यात आली आहे .या योजनेमध्ये जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कुरणे यांचे 56 हजार रू जमा झाले होते.त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यानंतर त्याच्या खात्यावर जमा झालेल्या 56 हजार रु च्या 20 पट म्हणजे 11 लाख 20 हजार व संस्थेकडील मयत सभासद कुटुंब कल्याण निधीतून 4 लाख असे मिळून एकूण 15 लाख 20 हजारचा निधीचा लाभ त्यांच्या कुटुंबियांना झाला.मयत सभासद विजय कुरणे यांचे पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज वजा जाता उर्वरित 4 लाख 57 हजार रु चा निधी पतसंस्थेच्या चेअरमन रोहिणी येडगे यांच्या हस्ते त्यांच्या वारस वैशाली विजय कुरणे यांना वितरीत करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे हे होते.*
*यावेळी बोलताना पतसंस्थेच्या चेअरमन रोहिणी येडगे यांनी विजय कुरणे यांचे दुःखद निधन ही चटका लावणारी गोष्ट असली तरी त्यांनी सभासद कुटुंब कल्याण योजनेत संपूर्ण सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना हा आर्थिक लाभ मिळाला असलेने त्यांना दिलासा मिळाला आहे.*
*अध्यक्ष पदावरून बोलताना भरत रसाळे यांनी विजय कुरणे यांनी सभासद कुटुंब कल्याण योजनेचे महत्त्व ओळखून यामध्ये सहभाग घेऊन निधनानंतरही त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेतली आहे हे विसरून चालणार नाही.इतर सभासदांनीही या योजनेमधील आपली भागिदारी खंड न पाडता चालू ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.*
*यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजी सोनाळकर यांनी प्रस्ताविक केले,मा.सचिव अरुण गोते यांनी आभार मानले.*
*या कार्यक्रमास मच्छिंद्र नाळे, साताप्पा कासार , अमित परीट, कृष्णात चौगले, सर्जेराव नाईक,वर्षाराणी वायदंडे, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, संदीप सातपुते, विनोद घुले, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते*
[ *मयत सभासद कुटुंब कल्याण योजनेतून पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी.* *एप्रिल 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेचा लाभ प्रत्यक्ष मयत सभासदाच्या कुटुंबाला झाल्याने संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सभासदांच्या पाठीशी संस्था उभी राहू शकते हा विश्वास दृढ झाला आहे*]
……
*मा. संपादक सो*
*वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावे ही नम्र विनंती*
*आपला*
*भरत रसाळे*
*संस्थापक, कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर*



