ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेवून खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून त्यांचे सांत्वन

Spread the news

ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेवून खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून त्यांचे सांत्वन

­

 

ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची आज खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केले. सखोल आणि चौफेर अभ्यास करून इतिहास मांडणार्‍या एका व्यासंगी व्यक्तीमत्वाला आपण मुकल्याची भावना खासदार महाडिक यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे नुकतंच निधन झाले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी डॉ. पवार यांच्या निवासस्थानी भेट देवून, त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या दोन्ही कन्या आणि कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते. कोल्हापूरला डॉ. जयसिंगराव पवार यांच्या रूपाने एक द्रष्टा आणि साक्षेपी अभ्यासक लाभला होता. वर्षानुवर्ष अंधारात असलेल्या अनेक महापुरूषांचे चरित्र समाजासमोर आणण्यात डॉ. पवार यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!