श्रीराम पचिंद्रे यांच्या कादंबरीतील पाठ
मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमात
कोल्हापूर: श्रीराम पचिंद्रे यांच्या ‘शाहू’ ह्या कादंबरीतील एका प्रकरणाचा मध्य प्रदेश सरकारच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. मराठी माध्यमाच्या ‘प्रथम भारती’ ह्या मराठीच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकासाठी ह्या पाठाची निवड करण्यात आलेली आहे. श्रीराम पचिंद्रे यांच्या ‘शाहू’ कादंबरीच्या मराठी आणि इंग्रजी अनुवादाच्या नऊ -नऊ आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. याच कादंबरीतील पाठ बालभारतीच्या शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पाचवीच्या पुस्तकात यापूर्वीच समावेश करण्यात आलेला आहे.




