कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर, दि. १४:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी झाली. बँकेच्या संचालिका सौ. श्रुतिका काटकर व सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, सर्व व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कमर्शियल बँकेचे संचालक युवराज गवळी, ॲड. शाहू काटकर तसेच; केंद्र कार्यालय व कोल्हापूर शहरातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




