काँग्रेस किसान आणि स्वाभिमानी आक्रमक; ऊसाला ५००० रुपये दर जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही

Spread the news

काँग्रेस किसान आणि स्वाभिमानी आक्रमक; ऊसाला ५००० रुपये दर जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही

­

 

कागल / केनवडे : ऊस दर जाहीर न करताच श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स, केनवडे यांनी चालू गळीत हंगाम सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेस किसान सेल आक्रमक झाले आहेत.

  •  

प्रति टन ५००० रुपये दर जाहीर करूनच कारखाना सुरू करावा व ऊस परिषदेत दराबाबत जो अंतिम तोडगा निघेल तो दर देणे बंधनकारक राहील, असे निवेदन आज कारखाना प्रशासन व चेअरमन संजयबाबा घाटगे यांना देण्यात आले. दर जाहीर न करता कारखाना सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडू आणि होणाऱ्या नुकसानीस कारखाना प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील, कोल्हापूर शहराध्यक्ष एड. संदीप चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील सर, जिल्हा सरचिटणीस नितेश कोगनोळे, तालुकाध्यक्ष नामदेवराव भराडे, करवीर तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील यांच्यासह काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष रणजीत पाटील, अवधूत गायकवाड, शरद वास्कर, राघव आसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यासोबतच तानाजी मगदूम, शिवाजी कासोटे, पांडुरंग चौगुले, तानाजी चौगुले, बाजीराव देवाळकर, संभाजीराव यादव, उत्तम बाबरे, शिवाजी कळमकर, राणोजी गोधडे, युवराज पवार, भानदास खोंद्रे, सुधाकर चौगुले, दत्तात्रय पाटील, उत्तम आवळेकर, सुनील पाटील, एकनाथ भराडे, अभिजीत पाटील व मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावर चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी संचालक मंडळाबरोबर चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे शिष्टमंडळास सांगितले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!