*स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या समाधीला माजी संचालकांचे अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला अभिवादन*

Spread the news

*स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या समाधीला माजी संचालकांचे अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला अभिवादन*

चुये, दि. १४:
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात मंगळवार दि. १५ पासून म्हणजेच आजपासून होत आहे. दरम्यान; अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला सोमवार दि. १४ गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकांनी चुये ता. करवीर येथे जाऊन गोकुळचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत श्री. आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या समाधीला मनोभावे अभिवादन केले. समाधीला पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले.

­

 

यावेळी माजी आमदार राजेश पाटील, विश्वासराव पाटील- आबाजी, अरुणराव डोंगळे, नविद मुश्रीफ, अजित नरके, युवराज पाटील -बापू, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगुले, डॉ. सुजित मेणचेकर, करणसिंह गायकवाड, एस.आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, अशोक फराकटे आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
…………..
चुये ता. करवीर येथे गोकुळ दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव पाटील -चुयेकर यांच्या समाधीला गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकांनी मनोभावे अभिवादन केले.
===========

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!