Spread the news

*करवीर तालुक्याचा डाग पुसून काढण्याच्या झाल्या आणाभाका*

­

 

*खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, राहुल पाटील, विश्वास पाटील या नेतेमंडळींसह ठराव धारकांचा निर्धार*

  •  

*ठराव धारकांच्या मेळाव्यात छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला एकमुखी पाठिंबा*
​
कोल्हापूर, दि. १४:
गोकुळ दूध संघाची निवडणूक म्हटली की चर्चेत आणि केंद्रस्थानी असतो तो करवीर तालुका. या तालुक्याच्या अनुषंगाने या निवडणुकीची चर्चा करवीर तालुक्याभोवतीच रंगत असते. या तालुक्यातील ठरावधारक आपल्या तालुक्यातील उमेदवारालाच मते टाकतात, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असा संपूर्ण जिल्ह्याचाच समज झालेला आहे. साहजिकच याचा फटका चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा अशा दूरवरच्या तालुक्यातील उमेदवारांना बसतो. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये अशी चर्चा झालेली आहे. अनेकांनी अशी खंतही व्यक्त केलेली आहे.
​
या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील नेतेमंडळी खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, विश्वास नारायण पाटील (आबाजी), राहुल पी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक आदी प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.

या सर्व नेतेमंडळींनी निर्धार केला की, आपण सर्व ठराव धारकांना बोलावून, अनाभाका घेऊया आणि आपल्यावरील हा डाग पुसून काढूया. असं नियोजन करून त्यांनी आज या सर्व प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्वच ठराव धारकांना बोलावून हा डाग कायमचा पुसून काढण्याचा निर्धार झाला. त्यानुसार कोल्हापुरातील पुईखडी येथील संकल्प सिद्धी सांस्कृतिक हॉलमध्ये एकूण ८६५ पैकी ७०० हून अधिक ठराव धारक एकत्र जमले होते. सर्वांनीच उपस्थित नेतेमंडळींना विश्वास दिला की महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्वच म्हणजे २५ उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करणार. या माध्यमातून यापूर्वीच्या निवडणुकांमधून झालेला या तालुक्याबद्दलचा गैरसमज दूर करण्याचाही निर्धार झाला.

करवीर तालुक्यावरील चुकीचा शिक्का यंदाच्या निवडणुकीत पुसणार!

छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देण्याचा ठरावधारकांचा निर्धार

कोल्हापूर, ता. १३ : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत करवीर तालुक्यातील ठरावधारक केवळ आपल्याच तालुक्यातील उमेदवारांना मतदान करतात आणि इतर तालुक्यांतील उमेदवारांना डावलतात, असा चुकीचा शिक्का करवीर तालुक्यावर बसला आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत हा शिक्का कायमचा पुसून छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार करवीर तालुक्यातील ठरावधारकांनी एकमताने व्यक्त केला. कोल्हापूर येथे आयोजित करवीर तालुका ठरावधारकांच्या मेळाव्यात हा निर्धार करण्यात आला.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, आम्ही जरूर वेगवेगळ्या पक्षांचे आणि विचारधारांचे आहोत. परंतु; दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आम्ही सर्वजण महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आलो आहोत. आपण सर्वच ठरावधारकांनी एकजुटीने पॅनल टू पॅनल मतदान करूया आणि महायुतीला ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करूया.

चंद्रदीप नरके म्हणाले, आज आपण सर्वजण मतभेद विसरून एकत्र आलो आहोत. ठराव गोळा करताना आपल्यात चढाओढ झाली, राजकारणात हे स्वाभाविक आहे. मात्र, आता सर्व मतभेद बाजूला ठेवून गोकुळच्या हितासाठी एकदिलाने काम करत आहोत. आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निश्चय करूया. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत करवीर तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ.

गोकुळचे माजी चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी) म्हणाले, ‘‘करवीर तालुक्यातील सर्व ठरावधारकांनी एकजुटीने संपूर्ण पॅनलच्या विजयासाठी काम करावे. केवळ आपल्या तालुक्यातील उमेदवारांचा विचार न करता आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान करावे. करवीर तालुक्यातून आघाडीला विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास आहे.’’

राहुल पाटील म्हणाले, ‘‘इतर राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून गोकुळच्या निवडणुकीत सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. संपूर्ण आघाडीच्या विजयासाठी प्रत्येक ठरावधारकाने जबाबदारीने प्रयत्न करावेत.

यावेळी उपस्थित ठरावधारकांनी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना एकजुटीने मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

==========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!